शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हात झटकण्याची मानसिकता बदला

By admin | Updated: April 16, 2016 02:13 IST

‘हे माझे काम नाही, असे म्हणून हात झटकण्यापेक्षा अपनी सोच बदलो, फिर देखो क्या होता हैं,’ असा लाखमोलाचा सल्ला आज चित्रपट अभिनेते आमीर खान यांनी बीड जिल्ह्यातील

अंबाजोगाई (जि. बीड) : ‘हे माझे काम नाही, असे म्हणून हात झटकण्यापेक्षा अपनी सोच बदलो, फिर देखो क्या होता हैं,’ असा लाखमोलाचा सल्ला आज चित्रपट अभिनेते आमीर खान यांनी बीड जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. पाणी फाउंडेशनच्या वतीने आमीर खान जलजागृती करणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी त्याने अंबाजोगाईत अधिकाऱ्यांची एक बैठकच घेतली. यावेळी त्याने बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत आपण सर्वांनीच पाण्याच्या विषयावर काम केले तर हे सगळे चित्र बदलून जाईल, असा आशावादही व्यक्त केला.वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणकुमार परदेशी, ‘सत्यमेव जयते’चे सत्यजित भटकळ, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे आदी उपस्थित होते. पाणी फाउंडेशनच्या वतीने सध्या अंबाजोगाई तालुक्यात २० ठिकाणी काम सुरू आहे. श्रमदानातून काम करणाऱ्यांना पाणी फाउंंडेशनच्या माध्यमातून प्रोत्साहन व मार्गदर्शन करणार असल्याचे त्याने सांगितले. यावर्षी पाणी फाउंडेशनने सुरू केलेले हे काम पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात नवीन ओळख निर्माण करणारे ठरेल, अशी आशाही आमीरने बोलून दाखविली. शासनाच्या वतीने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नरेगा’च्या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात.