शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन त्रुटीपुर्ण पीक आणेवारी बदला

By admin | Updated: July 18, 2016 04:03 IST

पीक आणेवारीच्या सर्वेक्षणाची जुनी पद्धत बदलणे गरजेचे असून ब्रिटिशकालीन पीक आणेवारी निश्चितीची पद्धत आजच्या काळात कालबाह्य ठरली आहे़ शेतीत क्रांतिकारक बदल झालेले आहेत़.

विक्रमगड : पीक आणेवारीच्या सर्वेक्षणाची जुनी पद्धत बदलणे गरजेचे असून ब्रिटिशकालीन पीक आणेवारी निश्चितीची पद्धत आजच्या काळात कालबाह्य ठरली आहे़ शेतीत क्रांतिकारक बदल झालेले आहेत़. शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढला आहे़ मात्र त्या तुलनेत शेतीच्या उत्पादनांना योग्य दर मिळत नाही. किंबहुना उत्पादन खर्च भरून निघेलच इतकाही मोबदला मिळत नाही़ पीककापणीचे प्रयोग झाल्याशिवाय आणेवारी जाहीर करता येत नाही. ़प्रत्येक गावात पीककापणीचे बारा प्रयोग होणे बंधनकारक आहे़ प्रत्यक्षात पीक आणेवारी मोजणी समिती कोणत्याही गावाच्या शिवारात जात नाही. नजरअंदाजाने पिकांची आणेवारी ठरवली जाते़ त्यातही दहा वर्षांतील उत्पादनापैकी सर्वाधिक उत्पन्न मिळालेल्या तीन वर्षांचे उत्पादन प्रमाण मानले जाते़ बँकांचे कर्ज आणि सरकारी मदत ही चुकीच्या पद्धतीने काढलेल्या आणेवारीवर दिली जाते़ साहजिकच याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यालाच बसतो़ अलीकडच्या काळात पिकांचे हंगाम बदललेले आहेत़ पूर्वी ७ जूनला होणारी पेरणी दोनचार वर्षांपासून जुलैशिवाय होतच नसल्याचा बहुतांश शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मग पीककापणीचे प्रयोग सरकारी परिपत्रकानुसार कसे होणार, असा नवीन प्रश्न समोर आला आहे. शेतकरी जगवायचा असेल तर पीक आणेवारी व्यवहारी व शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजणी करणे आज काळाची गरज बनली आहे़ पीक आणेवारी पद्धत काढणारी यंत्रणा काटेकोर वस्तुनिष्ठ हवी़ हंगामानुसार पेरणी होताच पीककापणीचे प्रयोग प्रत्येक गावात राबविले जाणे आवश्यक आहे़ पण तसे होत नाही़ उत्पन्न आणि उत्पादन खर्चातील तफावत आणि आणेवारीची चुकीची पद्धतच शेतकऱ्यांच्या आत्महत्येला एक प्रमुख कारण बनले आहे़. शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे़ (वार्ताहर)>सध्याच्या पद्धतीत सरकारने नेमलेल्या समितीकडून विभागीय स्तर व गावपातळीवर १२ प्रयोग करण्यात येतात़ मात्र या समित्या काहीच करत नसल्याचे प्रत्येक गावातील ग्रामस्थांची तक्रार आहे़ या तक्रारींचा विचार करूनच ही जुनी ब्रिटिशकालीन आणेवारीची पद्धत बदलण्याची एकमुखी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे़