शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, लातूर, परभणी मनपा निवडणूक १९ एप्रिलला!

By admin | Updated: March 23, 2017 03:23 IST

चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १९ एप्रिलला मतदान होणार आहे. २१ एप्रिलला निकाल जाहीर करण्यात येईल.

मुंबई : चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १९ एप्रिलला मतदान होणार आहे. २१ एप्रिलला निकाल जाहीर करण्यात येईल. या महापालिकांच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी या महापालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज रविवार, २ एप्रिललादेखील स्वीकारण्यात येतील. २८ मार्च रोजी गुढीपाडव्याची सुटी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सांगली- मीरज- कुपवाड महानरपालिकेतील प्रभाग क्र .२२ ब, जळगाव महापालिकेतील प्रभाग क्र .२४ अ आणि कल्याण- डोंबिवली महापालिकेतील प्रभाग ४६ च्या रिक्तपदासाठीदेखील १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या शिवाय, धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणिअकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील १९ एप्रिललाच मतदान होईल. ईव्हीएमच्या वापराबाबत...इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नसल्याची खात्री इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीकडून करून घेण्यात आली आहे, असे स्पष्ट करून राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया म्हणाले की, या सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत विविध तक्र ारी आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या. काही जणांनी आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा म्हणजेच वोटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेलचा (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापर करावा, अशा सूचनाही केल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ रोजी दिले आहेत. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर या यंत्राचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी आवश्यकतेनुसार प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे. या यंत्रांची व निधीची उपलब्धता इत्यादींबाबत सर्वंकष विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आता लगेच चंद्रपूर, लातूर व परभणी महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा वापर करणे शक्य होणार नाही, असे सहरिया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना पत्र परिषदेत स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)