शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान

By admin | Updated: November 18, 2016 06:28 IST

महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढवित त्यांना

मुंबई : महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढवित त्यांना राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दुसरे स्थान देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज या बाबतचे परिपत्रक जारी केले. पाटील हे विधानपरिषदेत सत्तारुढ पक्षाचे नेते आहेत. एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असेपर्यंत विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसत असत. आता त्या जागी चंद्रकांत पाटील बसणार आहेत. पाटील यांचे महत्त्व वाढविताना मराठा फॅक्टर लक्षात घेण्यात आल्याचे मानले जाते. पाटील हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे ते निकटवर्ती मानले जातात. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर महत्त्वाचे महसूल खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आले. फडणवीस मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री कोण हा प्रश्न खडसेंच्या राजीनाम्यानंतर अनुत्तरित होता. मुख्यमंत्र्यांनी आता चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढवित त्याचे उत्तर दिले आहे. आता ते मंत्रिमंडळाच्या बैठकीतदेखील मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसतील. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे हे सांसदीय कारकिर्दीचा अधिक अनुभव असलेले मंत्री या मंत्रिमंडळात आहेत. तथापि, मुख्यमंत्र्यांशी असलेले सलोख्याचे संबंध, भाजपा श्रेष्ठींशी असलेली जवळीक आणि मराठा समाजाचे असणे या बाबींमुळे चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे स्थान मिळाले, असे मानले जात आहे. (विशेष प्रतिनिधी)