शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

चंद्रकांत खैरेंना नगरसेवकाने सुनावले

By admin | Updated: June 9, 2017 04:31 IST

शिवसेनेच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील राजकारणाचा स्फोट झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील राजकारणाचा स्फोट झाला. खा. चंद्रकांत खैरे आणि माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचे समर्थक नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्यात व्यासपीठावरच शाब्दिक चकमक झाली आणि एकमेकांना शिवीगाळही केली. कशाला अपमान करून घेता, असे नगरसेवक जंजाळ यांनी खैरेंना सुनावलेसंत एकनाथ रंगमंदिरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या समक्ष हा प्रकार घडला. जंजाळ यांचे कुठल्याही प्रेसनोट आणि जाहिरातींमध्ये नाव नव्हते. त्यांच्याकडे भाविसेचे राज्य निमंत्रकपद असतानाही त्यांना डावलल्याची भावना प्रदीप जैस्वाल यांनी भाषणातून व्यक्त केली. त्यानंतर संपर्कप्रमुख घोसाळकर भाषणात म्हणाले, जैस्वाल तुमच्या मनोगताची पक्षाने नोंद घेतली आहे. या दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या विरोधात भाषणे सुरू असताना जंजाळ हे बाहेर जाण्यासाठी घोसाळकर यांची परवानगी घेण्यासाठी आले. तेथे खैरे यांनी जंजाळ यांचा हात पकडला. यातूनच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. राज्यमंत्री खोतकर यांनीही जंजाळ यांना समजावण्याचा प्रयत्न केला. जैस्वाल यांनी जंजाळ यांना व्यासपीठावरून खाली नेले. त्यांची समजूत काढण्यासाठी नरेंद्र त्रिवेदी, विकास जैन यांनी प्रयत्न केला. जाताना जंजाळ म्हणाले, आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, गुलाम नाही. शिवसेना कुणाची प्रायव्हेट लि. प्रॉपर्टी नाही. अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडल्यामुळे येथे पक्ष उभा राहिला आहे. पक्षात (कुणाचेही नाव न घेता) फॉर्च्युनर गाडी असणारे गब्बर असल्याचा टोला खा. खैरे यांनी भाषणात लगावला. (अंबादास दानवे, जंजाळ यांच्याकडे फॉर्च्युनर आहे). हे फॉर्च्युनरवाले पक्षाच्या मोठ्या पदावर बसले असून, तेच पक्षविरोधी काम करीत आहेत. गटबाजी करणाऱ्यांना आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांना कानपिचक्या द्याव्या लागतील. त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल, असे खैरे म्हणाले.।त्या दोघांमध्ये झालेला संवाद जंजाळ घोसाळकर यांना म्हणाले, साहेब, मला काम आहे, मी जाऊ का? खा. खैरे जंजाळ यांचा हात पकडून म्हणाले : तू जास्त आखडू नकोस. जंजाळ खैरेंना म्हणाले : जाऊ द्या ना... साहेब कशाला अपमान करून घेता.खा.खैरे : तुला जायचे ना, तर जा...संतापून जंजाळ म्हणाले : अपमान करून बोलू नका.याप्रकरणी जंजाळ यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, वरिष्ठांसमोर हे प्रकरण घडले. त्यामुळे त्यांना माहिती आहे. सुरुवात कुणी केली. खैरेंनी माझा हात धरून अपमानास्पद बोलायचे काहीही कारण नव्हते.