शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

ईस्थर अनुह्या हत्याप्रकरणी चंद्रभान सानपला फाशी

By admin | Updated: October 31, 2015 02:36 IST

आंध्र प्रदेशमधील २३वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या हिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या ३९वर्षीय चंद्रभान सानपला शुक्रवारी

मुंबई : आंध्र प्रदेशमधील २३वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या हिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या ३९वर्षीय चंद्रभान सानपला शुक्रवारी विशेष महिला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. ‘ही केस दुर्मीळ प्रकारात मोडत असल्याने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे,’ असे विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी म्हटले.सरकारी वकिलांनी सानपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. सानपला सहानुभूती दाखवली तर समाजात चुकीचा संदेश जाईल; तसेच समाजाला आणि तिच्या पालकांना न्याय मिळाल्यासारखे वाटणार नाही. आरोपीने एका असहाय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. त्या मुलीने आरोपीवर विश्वास ठेवला आणि त्याने त्याचा फायदा घेतला, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी केला होता. तर बचावपक्षाच्या वकिलांनी त्याचे वय लक्षात घेता न्यायालयाने त्याला सहानुभूती दाखवावी, अशी विनंती न्या. जोशी यांना केली. २७ आॅक्टोबर रोजी न्यायालयाने सानप याला भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या), ३७६ (बलात्कार) आणि कलम २०१ (पुरावे नष्ट करणे)यांद्वारे दोषी ठरवले.ईस्थर हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी आंध्र प्रदेशमधील विजयवाडा पोलीस स्टेशनमध्ये केली. मात्र त्यांनी हे प्रकरण आपल्या अखत्यारीत येत नाही, असे म्हणत मुंबईमध्ये तक्रार करण्यास सांगितले. अखेरीस ईस्थरच्या काकांनी आणि वडिलांनी कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.(प्रतिनिधी)टीसीएसमध्ये असिस्टंट सिस्टीम इंजिनीअर असलेली ईस्थर अनुह्या आंध्र प्रदेशमध्ये तिच्या पालकांकडे गेली होती. ५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे ईस्थर लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरली. मात्र गोरेगावला जाण्यासाठी काहीच सोय नसल्याने ती तेथे बराच काळ थांबली. याचा फायदा घेऊन सानपने तिला आपल्या बाइकवर बसण्यास सांगितले. त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली.फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सानपला कोर्टरूमच्या बाहेर आणल्यावर त्याला अश्रू आवरता आले नाहीत. सानप ढसाढसा रडला. आपल्याला या केसमध्ये नाहक गोवण्यात आले आहे. खोटे आरोप लावण्यात आले आहेत, असे सानपने कोर्टाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना म्हटले.कोणताही गुन्हा न करता मला फाशीची शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा मला नव्हती. मी माझ्या मुलीला दोन वर्षे पाहिलेले नाही, असेही सानपने म्हटले.