शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा

By admin | Updated: August 10, 2016 04:38 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला.

मुंबई /नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. कुलपती व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी तो स्वीकारला. विद्यापीठातील कामकाज आणि विशेषत: कंत्राटी कर्मचारी भरतीवरून शासकीय पातळीवरून उडालेले खटके या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीमाना दिल्याचे येत आहे. कुलगुरूंनी मात्र व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे.मुक्त विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश शासनाने देऊनही डॉ. साळुंके यांनी ते मानले नव्हते. उलट ही भरती बेकायदेशीर असल्याचे कुलगुरूंचे म्हणणे होते. मध्यंतरी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याच मुद्यावरून खटके उडल्याची चर्चा आहे. त्यातून कुलगुरूंना राजीनामा देण्यासाठी राज्यपालांनी सूचित केल्याची चर्चा गेल्या आठ दिवसांपासून सुरू होती. डॉ. साळुंखे यांचा १८ आॅगस्टला कुलगुरूपदावरील शेवटचा दिवस असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलवून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले. आॅडिट स्पष्ट असल्याचे सांगताना त्यांनी विद्यापीठात अनेक गोंधळ सुरू असल्याचे सांगितल्याचे समजते. विशेषत: काही अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची विद्यापीठात यापूर्वी झालेली भरती आणि अन्य प्रश्नांवर त्यांनी हात ठेवल्याचे कळते. याबाबत कुलगुरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही. डॉ. साळुंखेयांनी चौदावे कुलगुरू म्हणून १९ आॅगस्ट २०१४ रोजी कार्यभार स्वीकारला होता. (प्रतिनिधी)