शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, आठवलेंची वर्णी लागण्याची शक्यता

By admin | Updated: July 4, 2016 11:45 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार होणार असून सकाळी 11 वाजता नवीन मंत्री शपथ घेणार आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 04 - केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार होणार असून सकाळी 11 वाजता नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या दहा मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी स्वतः सर्व मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुप्रिया पटेल, पुरुषोत्तम रुपला,  अर्जून राम मेघवाल, पीपी चौधरी आणि रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून नाव निश्चित करण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याची चर्चा आहे. 
 
मोदींच्या मंत्रिमंडळात कोणत्या नव्या चेहऱ्याला स्थान मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील एखादा नवा चेहरा केंद्रीय मंत्रिमंडळात पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.