मुंबई : माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच गुरुवारी सकाळी चेंबूर येथील वाशी नाका परिसरात दरड कोसळून गणेश कुराडे या ६ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत गणेशचे आई-वडीलही जखमी झाले आहेत.गेल्या १० ते १२ वर्षांपासून चेंबूरच्या सह्याद्रीनगरामध्ये कुराडे दाम्पत्य आपल्या तीन मुलांसमवेत वास्तव्य करीत आहे. कुमार कुराडे यांचे कुटुंब गुरुवारी सकाळी निद्रावस्थेत असताना त्यांच्या झोपडीवर दरड कोसळली. या घटनेपूर्वी कुमार यांना काहीशी चाहूल लागल्याने त्यांनी तत्काळ त्यांचा १० वर्षांचा मुलगा व ४ वर्षांच्या मुलीला घराबाहेर काढले. मात्र ६ वर्षांच्या गणेशला घराबाहेर काढत असतानाच दरड झोपडीवर कोसळली आणि त्यात गणेशचा मृत्यू झाला. नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना द. मुंबईत तत्काळ पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएने या डोंगराच्या खालून इस्टर्न फ्री-वे तयार केला आहे. यासाठी एमएमआरडीएने येथील ५ हजार घरांचे पुनर्वसन केले आहे. मात्र अनेक कुटुंब या ठिकाणी जीव मुठीत धरून राहत असल्याने या घटनेला एमएमआरडीए जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. - आणखी वृत्त/हॅलो
दरड कोसळून चिमुरड्याचा मृत्यू
By admin | Updated: August 1, 2014 04:33 IST