नागपूर : वैध मापनशास्त्र (वजन व मोजमापे) नियंत्रक संजय पांडे यांच्या विविध निर्णयांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. पांडे यांनी कायदे पायदळी तुडवून निर्णय घेतल्याचा आरोप याचिकाकर्ते संजय गुप्ता व इतर ४४ वजन व मोजमापे उत्पादक व विक्रेत्यांनी केला आहे.वैध मापनशास्त्र नियंत्रकांनी नागपूर, अमरावती, बुलडाणा आदी जिल्ह्यांतील वजन व मोजमापे उत्पादक, विक्रेते व दुरुस्ती करणाऱ्यांचे परवाने रद्द केले आहेत. परवाने रद्द करण्याची कारणे अत्यंत किरकोळ आहेत. हा निर्णय घेताना कारणे दाखवा नोटीस व सुनावणीची संधी देण्यात आली नाही. अटींचे उल्लंघन करणे, कायद्याची पायमल्ली करणे किंवा खोटी माहिती देणे या तीन परिस्थितीतच परवाना रद्द केला जाऊ शकतो. याचिकाकर्त्यांनी यापैकी कोणतीही चूक केलेली नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
वैध मापनशास्त्र नियंत्रकांच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान
By admin | Updated: May 9, 2015 01:09 IST