शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या धोरणाला आव्हान

By admin | Updated: July 8, 2017 04:25 IST

राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या नव्या धोरणाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या नव्या धोरणाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह सिडको व नवी मुंबई महापालिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.उच्च न्यायालयाने मुंबई, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईतील दिघा, वसई-विरार व अन्य काही ठिकाणांवरील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा आदेश देण्याचा सपाटा लावल्यानंतर राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५पर्यंतची सर्व बांधकामे नियमित करण्याचे धोरण आखले. ते अंतिम होण्यापूर्वी उच्च न्यायालयाने दोनदा रद्द केले. तरीही सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक शहर नियोजन कायद्याच्या (एमआरटीपी) कलम ५मध्ये सुधारणा करत सर्व बेकायदा बांधकामांना अभय दिले. सरकारच्या या नव्या धोरणाला नवी मुंबईचे रहिवासी राजीव मिश्रा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. नवे धोरण विकासकांच्या व भूमाफियांच्या पथ्यावर पडणारे आहे. ज्यांनी सरकार, महापालिका, विशेष प्राधिकरणांच्या जागा हडपल्या आहेत त्यांना एक प्रकारे पाठीशी घातले आहे, असे याचिकेत म्हटले आहे.भलीमोठी रक्कम आकारून बेकायदा बांधकामे नियमित करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. नव्या धोरणामुळे आतापर्यंत ज्या विकासकांवर नियमे उल्लंघनप्रकरणी गुन्हा किंवा दोषारोपपत्र नोंदविण्यात आले त्या विकासकांची कारवाईमधून सुटका केली आहे. याशिवाय राज्य सरकारने एमआरटीपीमध्ये सुधारणा करण्यापूर्वी नागरिकांकडून हरकती व सूचना मागवायला हव्या होत्या. परंतु, सरकारने ही प्रक्रिया डावलून एमआरटीपी कलम ५मध्ये सुधारणा केली. त्यांचा निर्णय न्यायालयाच्या आदेशाशी व घटनेशी विसंगत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.शुक्रवारच्या सुनावणीत न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांनी सरकारसह सर्व प्रतिवाद्यांना या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी ८ आॅगस्ट रोजी ठेवली आहे. दरम्यान, महाअधिवक्त्यांनाही सुनावणीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.