शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माजी माहिती आयुक्तांच्या जामीन अर्जाला आव्हान

By admin | Updated: June 11, 2017 01:12 IST

आंबेडकर भवनाचे विश्वस्त असल्याचा दावा करणारे माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड व अन्य सहा जणांची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आंबेडकर भवनाचे विश्वस्त असल्याचा दावा करणारे माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड व अन्य सहा जणांची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आहे.न्या. रणजीत मोरे व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. खंडपीठाने गायकवाडांसह सर्व प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० मध्ये दोन भूखंड खरेदी केले. त्यापैकी एका भूखंडावर प्रिंटिंग प्रेस सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचा मुलगा यशवंत आंबेडकर (प्रकाश आंबेडकरांचे वडील) यांच्या मृत्यूनंतर प्रकाश आंबेडकर या प्रिंटिंग प्रेसचे मालक आहेत. तर १९४५ मध्ये डॉ. आंबेडकरांनी दुसरा भूखंड ट्रस्टच्या नावे केला. या दुसऱ्या भूखंडावरच आंबेडकर भवन व अन्य दोन बांधकामे बांधण्यात आली. गायकवाड व अन्य जणांनी कसे राजकारण खेळून आंबेडकर भवन व अन्य बांधकामे पाडली, हे सर्व याचिकेद्वारे निदर्शनास आणले आहे. या सर्वांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र सत्र न्यायालयाने या सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकर यांनी याचिकेत केली आहे.