शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

रखडलेल्या स्मार्ट सिटीला गती देण्याचे आव्हान

By admin | Updated: March 6, 2017 02:11 IST

स्मार्ट सिटी कार्पोरेशन ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून ५ वर्षांत शहर स्मार्ट बनविण्याचे स्वप्न पुणेकरांना दाखविण्यात आले.

पुणे : महापालिकेची यंत्रणा वेगाने काम करू शकत नाही म्हणून स्मार्ट सिटी कार्पोरेशन ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून ५ वर्षांत शहर स्मार्ट बनविण्याचे स्वप्न पुणेकरांना दाखविण्यात आले. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप या योजनेअंतर्गत एकही मोठा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आलेला नाही. नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपासमोर आता या रखडलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांना गती देण्याचे आव्हान असणार आहे. केंद्रात, राज्यात व आता महापालिकेतही भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्याने स्मार्ट सिटीची कामे रखडल्याचे खापर त्यांना आता कोणावरही फोडता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेसाठी देशभरातून स्पर्धा घेऊन पहिल्या टप्प्यात २८ जानेवारी २०१६ रोजी २० शहरांची निवड करण्यात आली आहे. पुणे शहराची यामध्ये दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. शहरामध्ये औंध-बालेवाडी-बाणेर हा भाग मॉडेल एरिया म्हणून विकसित करायचा, वाहतूक यंत्रणा सक्षम करायची, २४ तास पाणीपुरवठा करायचा यांसह अनेक मोठी स्मार्ट स्वप्ने या योजनेतून दाखविण्यात आली आहेत. त्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, स्मार्ट सिटीच्या मोठ्या प्रकल्पांची आतापर्यंत केवळ टेंडर काढण्याइतपत प्रगती झालेली आहे.महापालिकेच्या ताठर प्रशासनाकडून वेगाने विकासकामे होत नाहीत, त्यामुळे खासगी कंपनी स्थापन करून शहर स्मार्ट बनवायचे या मूलभूत संकल्पनेवर स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे २८ जानेवारीला स्मार्ट शहरांची निवड झाल्यानंतर वर्षभरात प्रचंड काम उभं राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना व्हायला मार्च महिना उजाडला. या कंपनीसाठी अजूनही स्वतंत्र कार्यालय उपलब्ध झालेले नाही. त्याचबरोबर स्मार्ट सिटीतील महत्त्वाच्या पदांसाठी जाहिरात देऊन त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नगररपालिका, विधान परिषद व महापालिका निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्याने स्मार्ट सिटीच्या कामांना त्याचा मोठा फटका बसला आहे. (प्रतिनिधी)5वर्षांत ३ हजार कोटी रुपयांची कामे स्मार्ट सिटी योजनेच्या आराखड्यानुसार पार पाडली जाणार आहेत. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने काही टेंडर काढण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील सिग्नलची व्यवस्था सुधारणे व कमांड कंट्रोल सेंटर उभारणे या प्रमुख दोन टेंडरचा समावेश आहे. >४ वर्षांत रिझल्ट दाखवावे लागणारस्मार्ट सिटी योजनेंतर्गत औंध-बालेवाडी-बाणेर हा भाग मॉडेल एरिया म्हणून विकसित करायचा, वाहतूक यंत्रणा सक्षम करायची, २४ तास पाणीपुरवठा करायचा यांसह अनेक मोठी स्मार्ट स्वप्ने ५ वर्षांत पूर्ण करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. योजनेची सुरुवात होऊन आता १ वर्ष उलटले असून, त्यामध्ये फारशी प्रगती झालेली नाही. उर्वरित ४ वर्षांमध्ये भाजपाला प्रत्यक्ष काम करून त्याचे रिझल्ट दाखविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात भाजपाचे वर्चस्वस्मार्ट सिटीच्या संचालक मंडळामध्ये आता भाजपाकडून महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृहनेता आदींना प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश या संचालक मंडळात प्रामुख्याने असणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेची सर्व सूत्रे आता भाजपाच्या हातात केंद्रित असणार आहेत.>औंधमधील रस्त्याचा प्रयोग फसलास्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडीमध्ये नदीसुधारणा, सोलर एनर्जी, स्मार्ट मीटरिंग, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे सुसूत्रीकरण, वाहनतळ, देखभाल दुरुस्ती, पाण्याचा पुनर्वापर आदी प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्याचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्न तिथल्या स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.