शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

समाविष्ट गावांच्या विकासाचे आव्हान

By admin | Updated: May 18, 2016 02:52 IST

महानगरपालिकेची अधिसूचना जाहीर करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागातील ६८ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रशांत शेडगे,

पनवेल- महानगरपालिकेची अधिसूचना जाहीर करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागातील ६८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात या भागाचा विकास करण्याचे आव्हान प्रस्तावित महानगरपालिकेसमोर आहे. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण, रस्ते, सांडपाणी व्यवस्था या सुविधा पुरविण्याकरिता महापालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.पनवेल महानगरपालिका व्हावी याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा आहे. १९९१ साली याबाबत प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात आली होती. मात्र अंतिम अधिसूचना व आदेश न निघाल्याने हा प्रस्ताव रखडला. परंतु पनवेल परिसराचा झपाट्याने विकास झाल्याने, त्याचबरोबर नागरीकरणाचा वेग कमालीचा वाढल्यामुळे महानगरपालिकेचा प्रस्ताव पुन्हा पुढे आला. त्यानुसार अभ्यास समितीने सादर केलेला अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला. सोमवारी रात्री यासंदर्भात अधिसूचना सुध्दा जारी करण्यात आली आहे. सिडकोने या भागातील जमीन संपादित करीत असताना गावठाणांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्राधिकरणाने सातत्याने दुर्लक्ष केले. या कारणाने वसाहतीत जरी झकास झाल्या असल्या तरी गाव मात्र भकासच राहिलेले आहेत. नैना आणि एमएमआरडीए क्षेत्रातील गावांचा सुध्दा प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आलेला आहे. या गावांचा विकासाचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली या वसाहती नियोजितरीत्या विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वसाहतीचा विषय सोडला तर जी गावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.>अनधिकृत बांधकामेविचुंबे, देवद, आकुर्ली, उसर्ली, सुकापूर या ठिकाणी बिनशेती परवाना, त्याचबरोबर टाऊन प्लॅनिंगची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीची घरबांधणी परवाना घेऊन टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. हे बांधकाम करताना एफएसआय त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी याचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रशासनाला डोकेदुखी होणार असल्याचे नगरपालिकेतील एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.