शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या वेतनवाढीला उच्च न्यायालयात आव्हान

By admin | Updated: August 9, 2016 04:18 IST

राज्य सरकारवर ३१ मार्च २०१६पर्यंत ३ लाख २९ हजार कोटी रुपये कर्ज असताना राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेऊन

मुंबई : राज्य सरकारवर ३१ मार्च २०१६पर्यंत ३ लाख २९ हजार कोटी रुपये कर्ज असताना राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेऊन सरकारला कर्जाच्या दरीत लोटले आहे, त्यामुळे राज्य सरकारचा आमदारांचे वेतन आणि निवृत्तिवेतन वाढवण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ५ आॅगस्ट रोजी राज्य सरकारने विद्यमान आमदारांचे वेतन दीड लाखावरून दोन लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला, तर आमदारांच्या निवृत्तिवेतनातही भरघोस वाढ करण्याचे जाहीर केले. मात्र यामुळे सरकारच्या तिजोरीवर ७९ हजार ९४१ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तर निवृत्तिवेतन म्हणून २४ हजार ७३० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. राज्य सरकारवर ३१ मार्च २०१६पर्यंत ३ लाख ७९ हजार कोटी रुपये कर्ज आहे. त्यावरील व्याज म्हणून सरकारला दरवर्षी २८ हजार २२० कोटी रुपये भरावे लागत आहेत. असे असतानाही राज्य सरकार आमदारांच्या वेतनात आणि निवृत्तिवेतनात प्रचंड वाढ करत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. याचिकेनुसार, सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, अशी सबब पुढे करून महापालिकेचे तीन हजार शिक्षक, पोलीस व अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. तर सकरारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार, वेतन देण्यास विलंब करत आहे. तरीही सरकारने आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला. हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात केली. (प्रतिनिधी)