शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तिघांच्या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान

By admin | Updated: March 4, 2016 03:02 IST

बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने जामिनावर मुक्तता केलेल्या विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळे या तीन नगरसेवकांच्या जामिनाला

जितेंद्र कालेकर,  ठाणेबिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने जामिनावर मुक्तता केलेल्या विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळे या तीन नगरसेवकांच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. त्याबाबतची परवानगी गुरुवारी राज्याच्या विधी विभागाने ठाणे पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.या प्रकरणी सर्वात आधी सशर्त जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या जामिनाला यापूर्वीच उच्च न्यायालयात ठाणे पोलिसांनी आव्हान दिले आहे. मुल्ला यांची ठाण्याचे विशेष जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयाने जामिनावर मुक्तता केल्यानंतर उर्वरित तिघे नगरसेवकही सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु विशेष सरकारी वकील गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली होती. या तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या दिवशीच मुल्ला यांच्या जामिनाला पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर, ७८ दिवसांनी तिघांचीही जामिनावर सुटका झाली.याचा तपास अद्याप अपूर्ण आहे, तसेच यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. चौघेही आरोपी जामिनावर सुटल्यास या गंभीर प्रकरणातील साक्षीदार, पालिकेचे अधिकारी आदींवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघेही नगरसेवक भूमिगत झाले होते. त्यांचे मोबाइल नॉट रिचेबल होते. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, या कलमासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे चौघांच्याही संपत्तीची चौकशी सुरू आहे. नगरसेवक झाल्यापासूनची त्यांची बँक खाती पडताळण्यात येत आहेत, असे अनेक मुद्दे जामिनाला आक्षेप घेताना सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांच्या पथकाने मांडले.