शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या विचारसरणीचा प्रसार रोखणे हेच आव्हान

By admin | Updated: March 13, 2016 05:03 IST

देशात सामाजिक विषमता वाढविण्याचे काम सुरू आहे. या विषमतेला जबाबदार असलेली भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारसरणी वाढविण्यासाठी पोषक

पुणे : देशात सामाजिक विषमता वाढविण्याचे काम सुरू आहे. या विषमतेला जबाबदार असलेली भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारसरणी वाढविण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती केली जात आहे. ती रोखणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले. राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस भवन येथे पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे, अनंतराव गाडगीळ, दीप्ती चौधरी, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम, शहर काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, उपमहापौर मुकारी अलगुडे आदी या वेळी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, केंद्रात आणि राज्यात अराजकता माजली आहे. विद्यार्थी, कामगार, महिला तसेच अल्पसंख्याकांचे आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे देशात असहिष्णुता आणि विषमता वाढत आहे. यामागे आरएसएसची विचारसरणी आहे. ती रोखण्याचे आव्हान असून, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस भवन येथे पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)शिर्डी : मन की बात जाऊ द्या, ती मतांसाठी आहे. आपण मात्र लोकांच्या दिल की बात समजावून घ्या, जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्यासाठी एकत्रितपणे आंदोलन करावे लागेल, असा सल्ला देत सध्या भाजपा व संघावाले मेक इन इंडियाच्या नावाखाली देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करीत आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या दोन दिवसीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अध्यक्षस्थानी होते. भाजपा सरकार देशात भीतीचे वातावरण निर्माण करून आपली वोट बँक निर्माण करीत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला़