शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मीटर रिकॅलिब्रेशनचे आव्हान

By admin | Updated: May 13, 2015 01:58 IST

रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला आहे. मात्र जोपर्यंत रिक्षा-टॅक्सींच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन

मुंबई : रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला आहे. मात्र जोपर्यंत रिक्षा-टॅक्सींच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन (मीटरमध्ये भाडेबदल) होत नाही, तोपर्यंत ही भाडेवाढ लागू होणे अशक्य आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भार्इंदर, उल्हासनगरसह अन्य एमएमआरडीए क्षेत्रात जवळपास साडेतीन लाख रिक्षा-टॅक्सी असून, अवघे १९ दिवस रिकॅलिब्रेशनसाठी आरटीओला मिळत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी आरटीओकडून प्रयत्न केले जाणार आहेत. रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ हकिम समितीच्या शिफारसीनुसार केली जात असून, २७ जुलै २0१२ रोजी ही शिफारस लागू करण्यात आली. त्यानंतर याच समितीच्या शिफारसीनुसार आतापर्यंत भाडेवाढ करण्यात आली आहे. एमएमआरडीएने आता रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात १ जूनपासून १ रुपया भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रिक्षाचे भाडे १७ रुपयांवरून १८ रुपये तर टॅक्सीचे भाडे २१ रुपयांवरून २२ रुपये होईल. मात्र त्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालकांना मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे गरजेचे असल्याचे आरटीओ अधिकारी सांगतात. जोपर्यंत मीटरमध्ये नवीन भाड्यासाठी बदल केला जात नाही, तोपर्यंत नवीन भाडे रिक्षा-टॅक्सीचालक आकारू शकत नाहीत. त्यामुळे रिकॅलिब्रेशन होणे गरजेचे असून, तेच मोठे आव्हान असल्याचे आरटीओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एमएमआरडीए क्षेत्रात सध्या रिक्षा-टॅक्सींची संख्या ही जवळपास साडेतीन लाख एवढी आहे. तर रिकॅलिब्रेशनसाठी हातात १९ दिवस शिल्लक असून, या दिवसांत मीटरमध्ये बदल करून १ जूनपासून नवीन भाड्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आता दोन दिवसांत हायकोर्टात भाडेवाढीची माहिती दिल्यानंतर सर्व आरटीओ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली जाईल. या बैठकीत रिकॅलिब्रेशन लवकरात लवकर करण्यासाठी नियोजन केले जाईल. त्यानंतर यासंदर्भात सर्व रिक्षा-टॅक्सी संघटनांसमवेतही बैठक घेण्यात येईल आणि चालकांकडून रिकॅलिब्रेशन करण्यासाठी त्वरित प्रतिसाद मिळावा यावर नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. साधारण ४५ दिवस रिकॅलिब्रेशनसाठी लागणार असले तरी त्यापेक्षा जास्त दिवसही लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.