शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांची ओबीसी दाखला मिळविण्यासाठी धडपड

By admin | Updated: July 20, 2016 02:06 IST

नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला असे आरक्षण आल्याने अनेक मातबर इच्छुकांनी ओबीसीचा दाखला मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

लोणावळा शहरात विकासकामांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या तुंगार्ली गावठाण या प्रभाग क्र. २मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला असे आरक्षण आल्याने अनेक मातबर इच्छुकांनी ओबीसीचा दाखला मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. काहींनी दूरदृष्टीने अगोदरच दाखला मिळवूनदेखील ठेवला आहे.पूर्वीच्या तुंगार्ली या चार सदस्यीय प्रभागातून न्यू तुंगार्ली व तुंगार्ली असे दोन प्रभाग झाले आहेत. मागील १५ वर्षांपासून या प्रभागाचे राजू बच्चे हे नेतृत्व करत असून, मागील पंचवार्षिकमध्ये अशोक मावकर हे दोघेही सर्वसाधारण जागेवर निवडून आले होते. ओबीसी महिला जागेवर जयश्री इंगूळकर यांनी सर्वाधिक मते घेतली होती. हे तीनही नगरसेवक हे तुंगार्ली गावठाण भागातील आहे. लोणावळा शहराच्या टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या तुंगार्ली प्रभागात नागरिकांच्या सहभागातून पहिला कचराकुंडीमुक्त प्रभाग तयार करण्यात आला. शहराच्या इतर प्रभागांसाठी तो रोल मॉडेल ठरला. तसेच या प्रभागातील गावभागातील रस्ते, गटारे इत्यादी कामे पूर्ण झालेली असली, तरी सर्वे नं. २ चा गुंठेवारीचा प्रश्न अद्यापही पूर्णत: सुटलेला नाही. अनेक सोसायट्यांचे रस्ते आजही खड्डेमय आहेत. या प्रश्नांच्या बळावर ही निवडणूक लढवली जाणार असून, खुल्या प्रवर्गातील अनेक इच्छुकांनी ओबीसीचा दाखला मिळविण्याची धडपड सुरू केली आहे. काहींना त्यामध्ये यश आले असून, काही अजूनही प्रयत्नशील आहेत. या प्रभागातील विद्यमान नगरसेविका जयश्री इंगूळकर, भाजपाच्या माजी अध्यक्षा सुरेखा पाडाळे, आशा खिल्लारे, सिंधू मालपोटे, माजी नगराध्यक्षा उषा चौधरी, अश्विनी आसवले, विद्यमान नगरसेवक राजू बच्चे, अशोक मावकर, जयवंत वांद्रे, गणेश मावकर, गणेश इंगळे, संजीव आसवले, रितेश गोसावी, मंगेश मावकर आदींचा समावेश आहे. यापैकी काहींच्या नजरा न्यू तुंगार्ली प्रभागावर, तर काहींच्या ओबीसीचा दाखला मिळवत तुंगार्ली गावठाणावर आहेत.