शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या थेट निवडीला आव्हान

By admin | Updated: September 29, 2016 02:47 IST

नगराध्यक्षांच्या पदाला स्थैर्य लाभावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५मध्ये सुधारणा

मुंबई : नगराध्यक्षांच्या पदाला स्थैर्य लाभावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५मध्ये सुधारणा करून नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांना करण्याचा अधिकार दिला. यावर राज्य सरकारने १९ मे २०१६ रोजी अध्यादेश काढला. या अध्यादेशाला इचलकरंजीच्या काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.राजकीय मर्जीनुसार काही महिन्यातच नगराध्यक्ष बदलण्यात येतात. याला आळा बसावा, नगराध्यक्षाला स्थैर्य मिळावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने नगराध्यक्षांची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या नव्या अध्यादेशामुळे नगरसेवकांनीच त्यांच्यातील एका नगरसेवकाला बहुमत देऊन नगराध्यक्ष निवडण्याची प्रथा मोडीत निघणार आहे. मतदारांनाच त्यांचा नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला इचलकरंजीच्या विठ्ठल चोपडे व अन्य काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ‘मतदाराने नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद घटनेमध्ये नाही. त्यामुळे राज्य सरकारची हा अध्यादेश घटनाबाह्य आहे. सरकारने मनमानीपणे अधिकाराचा वापर केला आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणारी याचिकाही इचलकरंजीच्या राजेंद्र पाटील व अन्य काही जणांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्याद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.‘इचलकरंजीमध्ये गेल्या पाच वर्षांत आठ ते दहा नगराध्यक्ष बदलण्यात आले. त्यामुळे इचलकरंजीचा विकास झाला नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. मतदारांनाच नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळावा,’ असे याचिकेत म्हटले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी) सरकारचा निर्णय मनमानी‘मतदाराने नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद घटनेमध्ये नाही. त्यामुळे राज्य सरकारची हा अध्यादेश घटनाबाह्य आहे. सरकारने मनमानीपणे अधिकाराचा वापर केला आहे,’ असे इचलकरंजीच्या नगरसेवकांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.