शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारपुढे वचनपूर्तीचे आव्हान

By admin | Updated: December 7, 2014 01:43 IST

शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील सरकार पूर्ण बहुमतात आणले असले, तरी सरकारमधील बहतेक मंत्री नवखे आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन : सत्ताधारी बाकांवर जबाबदारीचे ओङो
यदु जोशी - मुंबई 
शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील सरकार पूर्ण बहुमतात आणले असले, तरी सरकारमधील बहतेक मंत्री नवखे आहेत. अशा नव्या टीमच्या बळावर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला पहिल्यांदाच सामोरे जाताना या सरकारला बरीच कसरत करावी लागेल. विरोधी बाकांवर असतानाची आक्रमकता आणि आता सत्ताधारी बनल्यानंतर निवडणुकीतील आश्वासानांची पूर्तता करताना त्यांच्या नाकीनऊ येऊ शकतात.
अधिवेशन काही तासांवर आले असले तरी विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार, याबाबतची अनिश्चितता कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी या पदावर दावा केल्यामुळे विरोधकांमध्येच उभी फूट आहे. त्यामुळे या युती सरकारला विरोधकांच्या हल्ल्यांचा नव्हे, तर स्वत:च्याच आश्वासनाच्या पूर्ततेची कसोटी आहे. 
आतार्पयत विविध मुद्दय़ांवर घेतलेली भूमिका आणि आता त्याची अंमलबजावणी यातील विसंगती ठळकपणो दिसली, तर विरोधकांकडून सोपा बॉल आला तरी सरकार हिट विकेट होऊ शकते. ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ असे होता कामा नये, याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे.  फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी स्वत:बद्दल अशाच अपेक्षा वाढवून ठेवलेल्या असल्याने त्यांच्या पूर्ततेचे दडपण सरकारवर असेल. अधिवेशनाच्या तोंडावर सेनेला सोबत घेऊन भाजपाने सरकारचे बूड मजबूत केले असले, तरी निवडणुकीच्या काळापासून शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांतील नेत्यांची रुंदावलेली मने अजून पुरती सांधलेली नाहीत. शिवाय काल शपथविधी झाल्याने एकाही नव्या मंत्र्यास आपल्या खात्याचा अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. अधिवेशनात एखाद्या अवघड प्रश्नावर नवखे मंत्री चीत होऊ शकतात. त्यामुळे या अधिवेशनात विरोधक व सत्ताधारी दोघांचेही कौशल्य पणाला लागणार आहे. 
 
च्नागपूर करारानुसार अधिवेशन 
एक महिना चालावे. अधिवेशन गुंडाळण्याचा प्रय} झाला तर आम्ही सरकारला पळू देणार नाही.
च्कापसाला क्विंटलमागे किमान सहा हजार रुपये भाव दिलाच पाहिजे.
च्सत्ता आली तर टोलमुक्ती करणार. राज्यातून एलबीटी हद्दपार करणार
च्दुष्काळग्रस्त शेतक:यांना किमान 25 हजार रुपयांचे थेट पॅकज द्या.
च्राज्यात सत्ता आली तर स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करणार
 
आता काय भूमिका आहे ?
च्नागपूर अधिवेशनासाठी अवघ्या दोन आठवडय़ांचे कामकाज ठरविले आहे. विरोधकांनी मागणी केली, तर आणखी एक आठवडा चालेल.
च्कापूस उत्पादक शेतकरी दुष्काळी खाईत असताना कापसाला क्विंटलमागे अवघे चार हजार रुपये मिळत आहेत.
 
च्सरसकट टोल बंद करता येणार नाहीत, मात्र पारदर्शकता आणू. देशात जीएसटी लागू होईर्पयत राज्यात एलबीटी राहाणारच़
च्मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांना शासकीय नियमानुसारच मदत. पॅकेजची घोषणा नाही. सेना सत्तेत सहभागी झाल्याने स्वतंत्र विदर्भाचा विषय गुंडाळणार!