चाळीसगाव (जि. जळगाव) : सराफांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील सराफ व्यवसायाशी निगडित ४४० भाजपा सदस्यांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे.प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना त्यांनी राजीनामापत्र पाठविले आहे. आपल्या पक्षाची केंद्रामध्ये एकहाती सत्ता आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांवर अबकारी कर व त्यामधील जाचक अटी व शर्ती लागू केल्या आहेत. या कायद्यामुळे आमचा संपूर्ण व्यवसाय धोक्यात आलेला आहे, असे त्यात नमूद आहे. पत्रावर हितेश जैन, सुभाष जैन, महेंद्र वर्मा, चेतन वर्मा, राजेंद्र विसपुते आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
चाळीसगावच्या भाजपा सदस्यांचा राजीनामा
By admin | Updated: March 20, 2016 02:26 IST