ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 3 - शहरातील घाटी रुग्णालयात अपघात विभागासमोर एक मजुरावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी झाला असून, तीन लोकांनी या मजुरावर हल्ला केला आहे. ही घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. अब्दुल गफार खान ( 40, रा. कटकट गेट ) असे हल्ला होणाऱ्या मजुराचे नाव आहे. तसेच अब्दुल मनवर खान, रुबनान खान, मुक्तार खान असे हल्ले करणाऱ्या आरोपींचे नावे आहेत. आरोपी अब्दुल मनवर खान हे कटकट गेट परिसरातील पेट्रोल पंप चे मालक आहेत. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास मनवर खान, रुबनान खान, मुक्तार खान यांनी अब्दुल गफार खान यांना घाटातील अपघात विभागासमोर गाठत शिवीगाळ करत मानेवर, पोटावर, हातावर अशा 4 ठिकाणी भयंकर वर करीत चाकूहल्ला केला. घाटातील सुरक्षारक्षकांनी बघताच क्षणी आरोपींना ताब्यात घेतले आणि अब्दुल गफार खान यांना तात्काळ अपघात विभागात दाखल केले.
घाटीमधील अपघात विभागासमोर चाकूहल्ला ; एक जण गंभीर जखमी
By admin | Updated: May 3, 2017 21:53 IST