शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची केस लढणा-या वकिलावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 14:24 IST

पोटगीची मागणी करून कोर्टात गेलेल्या पत्नीला मदत करणा-या वकिलावर एका आरोपीने चाकूहल्ला केला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 9 - पोटगीची मागणी करून कोर्टात गेलेल्या पत्नीला मदत करणा-या वकिलावर एका आरोपीने चाकूहल्ला केला. जखमी पत्नीच्या मदतीला धावलेल्या वकिलाच्या पत्नीवरही आरोपीने चाकूचा वार केला. या हल्ल्यात वकील आणि त्यांची पत्नी जबर जखमी झाले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.संजय रामभाऊ पिंगळे (वय २९) आणि अश्विनी संजय पिंगळे अशी जखमी दाम्पत्याची नावे आहेत. आरोपी सुरज विनायक केळझरकर (वय २३) उमरेडचा (जि. नागपूर) रहिवासी आहे. त्याचे श्वेता नामक तरुणीसोबत लग्न झाले होते. व्यक्तिगत कारणामुळे पटेनासे झाल्याने त्याची पत्नी श्वेता हिने सूरजच्या विरोधात काही दिवसांपूर्वी पोलिसांत आणि कोर्टात धाव घेतली. त्यांचे प्रकरण कोर्टात नेण्यासाठी वकील संजय पिंगळे यांनी मदत केल्याची माहिती सूरजला मिळाली. त्यामुळे पिंगळे यांनी तिला मदत करू नये, अशी सूरजची भावना होती. त्याला दाद न मिळाल्यामुळे सूरज संतापला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास तो आपल्या एका साथीदारासह हुडकेश्वरमधील चक्रपाणी नगरात राहणारे वकील संजय पिंगळे यांच्या घरात शिरला. तुम्ही श्वेताला मदत का करता , अशी त्याने विचारणा केली. आपला व्यवसाय असल्यामुळे आपण तिची केस लढतो. आपण नाही लढली तर ती दुस-या कुण्या वकिलाकडे जाईल, असेही पिंगळेने आरोपीच्या लक्षात आणून दिले.

मात्र, ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या सूरजने पिंगळेशी वाद घातला आणि त्यांच्या तोंडावर, पोटावर चाकूचे वार केले. पतीवर चाकू हल्ला होत असल्याचे पाहून पिंगळे यांची पत्नी अश्विनी मदतीला धावल्या असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार केला. या हल्ल्यात पिंगळे दाम्पत्य जबर जखमी झाले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी पळून गेले.