शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चैत्र वणवा संपेना...

By admin | Updated: April 12, 2017 04:23 IST

उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची

पुणे : उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची काहिली होत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.देशात सौराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग तसेच कच्छ परिसरात उष्णतेची लाट आली आहे़ तमिळनाडूचा काही भाग, आसाम, मेघालय, पश्चिम राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रायलसीमा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी कमाल तापमानात वाढ झाली आहे़ राज्यात सर्वांत जास्त विदर्भ प्रभावित झाला आहे. उपराजधानी नागपूरसह सर्व प्रमुख शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढेच आहे. सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी सन्नाटा असतो. विदर्भापाठोपाठ खान्देश, मराठवाडादेखील होरपळून निघाला आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कधी नव्हे ते पश्चिम महाराष्ट्रातील पाराही चढला आहे. बागायती पट्ट्यातील सातारा, सांगलीत तापमानदेखील ४० अंशाच्या पुढे आहे प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :पुणे ३९़६, अहमदनगर ४१़६, जळगाव ४१़२, कोल्हापूर ३९़५़, महाबळेश्वर ३५़५, मालेगाव ४०़८, नाशिक ३९़९, सांगली ४१, सातारा ४०, सोलापूर ४१़९, मुंबई ३४, अलिबाग ३५़१, रत्नागिरी ३२़३, पणजी ३४़२, डहाणू ३३़५, उस्मानाबाद ४०़८, औरंगाबाद ३९़४, परभणी ४१़५, नांदेड ४१़५, अकोला ४१़५, अमरावती ४०़़२, बुलढाणा ३८़६, ब्रम्हपुरी ४१, चंद्रपूर ४२़६, गोंदिया ३९़५, नागपूर ४१, वाशिम ३८, वर्धा ४१़२, यवतमाळ ४०़ पुढील दोन दिवस तापमान वाढणार‘‘सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात उष्णतेचे लाट आली असून या वाळंवटी प्रदेशातून येणारे ४० अंश सेल्अिस तापमान असलेले उष्ण वारे महाराष्ट्रात येत आहेत़ त्यामुळे पुढील किमान दोन दिवस राज्यातील तापमान चढेच राहील. या वाऱ्यांची दिशा व त्या त्या ठिकाणचे भौगोलिक स्थान यानुसार तापमानात चढउतार होऊ शकतो. - डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ