शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

चैत्र चटका!

By admin | Updated: March 28, 2017 04:15 IST

गुजरातवर निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात उष्ण वारे वाहत असून, हवेतील सापेक्ष आर्द्रता कमालीची

सचिन लुंगसे / मुंबईगुजरातवर निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात उष्ण वारे वाहत असून, हवेतील सापेक्ष आर्द्रता कमालीची कमी झाल्याने अवघ्या राज्यात चैत्र महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहेत. मुंबईत समुद्रामुळे आर्द्रता अधिक असते मात्र येथील हवासुद्धा कोरडी झाल्याने मुंबईकरांच्या जिवाची काहिली होत आहे. राज्यात सोमवारी बहुतांश भागांतील कमाल तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसची मजल मारली. पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्याच्या काही भागांत आणि विदर्भाच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालिका शुभांगी भुते यांनी सांगितले. महाड ४३, ठाणे ४४ अंशावर रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये सोमवारी ४३ अंश तापमानाची नोंद झाली. ठाणे जिल्ह्यातही पारा ४४ अंशांवर गेला.बाष्पीभवनासह आर्द्रतादेखील तापमान वाढीसाठी कारण ठरत आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश आहे. मात्र कोरड्या हवेमुळे त्याचा प्रत्यक्ष दाह तब्बल ४२ अंश सेल्सिअस आहे. - अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञयंदा सरासरी ९५ टक्के पाऊस : जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने व्यक्त केला आहे़ त्यात ५ टक्के कमी-अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवण्याची शक्यता आहे. जूनमध्ये १०२, जुलैमध्ये ९४, आॅगस्टमध्ये ९३ तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.