शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-यांना ठोकल्या बेड्या

By admin | Updated: June 17, 2016 18:43 IST

तीन मोटारसायकल चोरणा-यांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी दिली.

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. 17 - मोटार सायकल चोरी करून त्यांच्या विक्रीतून मौज-मज्जा करणार्‍या तीन मोटारसायकल चोरणा-यांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यामध्ये हणमंत तानाजी देवकर (वय 21, रा. परिचारक नगर, पंढरपूर), आण्णा उर्फ अनिल भिमराव घोडके (वय 21, रा. फुटरस्ता, कोटी, ता. पंढरपूर), अक्षय राम काळे (वय 21, रा. कुंभार गल्ली, पंढरपूर) यांची नावे आहेत.पंढरपूर मंगळवेढा, अकलूज, सांगोला आदी भागात हणमंत तानाजी देवकर (वय 21, रा. परिचारक नगर, पंढरपूर), आण्णा उर्फ अनिल भिमराव घोडके (वय 21, रा. फुटरस्ता, कोटी, ता. पंढरपूर), अक्षय राम काळे (वय 21, रा. कुंभार गल्ली, पंढरपूर) हे मोटार सायकल चोरी करतात. त्यांची कमी किमतीत विक्री करतात आणि मिळालेल्या पैशातून मौजमज्जा करतात. हे तिघे त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांना मिळाली. पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षक किशोर नावंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. शेख यांनी तात्काळ त्या तीन मोटारसायकल चोरांना अटक केली. अटक करण्यात आलेल्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, पंढरपूर मंगळवेढा, अकलूज आणि सांगोला येथून मोटारसायकली चोरी केल्या. आजपर्यंत त्यांनी चोरी केलेल्या 10 मोटारसायकली देऊन चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटारसायकलीमध्ये 8 हिरो होंडा स्पेंल्डर मोटारसायकली, 1 टीव्ही, स्टार, मोटारसायकल आणि 1 हिरो शाईन या गाड्या जप्त करण्यात आल्या. हे आरोपी मोटारसायकली चोर्‍या करून त्यांची विक्री करतात. त्यातून आलेला पैश्यातून मौजमजा करतात, असे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली आहे.