शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ, अंकित कन्स्ट्रक्शनला उत्तरासाठी वेळ

By admin | Updated: May 7, 2014 22:14 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व अंकित कन्स्ट्रक्शनचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर कन्हेरे यांना १८ जूनपर्यंत वेळ दिला.

हायकोर्ट : सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळानागपूर : सार्वजनिक बांधकाम नागपूर विभागातील घोटाळ्याप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसवर उत्तर सादर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व अंकित कन्स्ट्रक्शनचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर कन्हेरे यांना १८ जूनपर्यंत वेळ दिला. दोघांच्याही वकिलांनी वेळ देण्याची विनंती केली होती. चौकशी समितीने अंकित कन्स्ट्रक्शनवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. यामुळे न्यायालयाने या कंपनीला पुढील आदेशापर्यंत कोणतेही नवीन कंत्राट देण्यावर बंदी घातली आहे. तसेच, चौकशी समितीने ठपका ठेवलेल्या कंत्राटदाराला वाचविण्याचा प्रयत्न केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, अवर सचिव वि. दि. सरदेशमुख, उपसचिव आर. जी. गाडगे, सचिव एस. के. मुखर्जी व कक्ष अधिकारी पी. जी. वंजारी यांना अवमानना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम नागपूर विभागात झालेल्या गैरव्यवहाराबाबत नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने जनहित याचिका दाखल केली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांची मध्यस्थी याचिका आहे. सर्व शासकीय इमारतींच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागात २००७ ते २०१० या कालावधीत सुमारे ११९.५४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.