शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेडिमेड खाद्यपदार्थांना खवय्यांची मागणी

By admin | Updated: July 4, 2016 03:23 IST

मुस्लीम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यामध्ये रोजे सोडण्याकरिता विविध पदार्थांची रेलचेल वाढली आहे.

दासगाव : मुस्लीम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यामध्ये रोजे सोडण्याकरिता विविध पदार्थांची रेलचेल वाढली आहे. पारंपरिक खाद्यपदार्थ आता काळाच्या ओघात मागे पडू लागले आणि रेडिमेडकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यात आता भर पडली आहे ती सोशल मीडियाची. रमजान सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर प्रत्येकाच्या मोबाइलवर विविध रेसिपी पहावयास मिळत आहेत आणि रोजे सोडण्यासाठीही याच पदार्थांना पसंती दिली जात आहे. यामुळे फळांबरोबर अनेक वस्तूंच्या किमती वाढत असून सध्या रमजानमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी पहावयास मिळत आहे.रमजान महिन्यालाही शास्त्रीय दृष्टिकोन आहे. किमान एक महिना मानवाच्या पचनसंस्थेस आराम मिळावा ही त्यामागची भावना. प्रत्येक दिवशी उपवास धरण्यापूर्वी आणि सोडल्यानंतर शरीराला आवश्यक पोषक आहार घेतला जाणे अपेक्षित आहे. याकरिता काही पारंपरिक खाद्यपदार्थ आणि फळांचा समावेश आहारात केला जातो. मात्र काळाच्या ओघात या महिन्यात आता उलट क्रिया केली जात आहे. मुस्लीम महिलांची रात्रभर तयारी सुरू असते. पहाटे विविध खाद्यपदार्थ रोजे धरणाऱ्याच्या समोर असतात. काळाच्या ओघात पारंपरिक पदार्थ मागे पडू लागले आणि हॉटेलमधील विविध तयार खाद्यपदार्थ खरेदी करण्याबरोबरच रेडिमेड पदार्थांकडे कल वाढलेला दिसून येतो. खीर, फालुदा, विविध आईस्क्रिम, विविध मसाले, खाद्यपदार्थ आता पॅकिंगमध्ये उपलब्ध झाले आहेत. यामुळे कमी वेळेत चटकदार पदार्थ खाण्याचा आनंद आता प्रत्येक जण घेत आहे. बाजारातील तयार समोसे, भजी, चिकन तंदुरी तसेच चिकनपासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांना जास्त प्रमाणात पसंती आहे. या वस्तू पूर्वी घरामध्ये तयार करण्यात येत होत्या, मात्र सध्या बाजारात सहजपणे उपलब्ध होत असल्याने घरात बनवणे बंद झाले आहे. (वार्ताहर)>पॅके टचे पदार्थखीर, फालुदा या वस्तू पूर्वी दुधापासून घरामध्येच तयार करण्यात यायच्या. याचा रमजान महिन्यात उपवास सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो मात्र सध्या या वस्तू बाजारामध्ये पॅकेटमध्ये उपलब्ध होत असल्याने घरी बनवण्यापेक्षा पॅकेटच्या वस्तूंना मोठे महत्त्व देण्यात येत आहे. यामुळे पाटा-वरवंटा घेवून विविध मसाले बनवण्याचे दिवस आता मागे पडू लागले आहेत.