शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

केंद्रीय पथकाकडून मिरजेत सोनोग्राफी केंद्रास टाळे

By admin | Updated: May 18, 2017 00:13 IST

म्हैसाळ भ्रूणहत्याकांड; अधिष्ठातांसोबत बैठक; आशा वर्कर्स, मदतनीसांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क --मिरज : आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने मिरजेत मंगळवारी डॉ. सोमशेखर पाटील यांच्या सोनोग्राफी केंद्राची तपासणी करून केंद्राला टाळे ठोकले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता व म्हैसाळ भ्रूणहत्याकांड प्रकरणातील चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यासोबत बैठक घेऊन पथकाने डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या चौकशीबाबत माहिती घेतली. पंचायत समितीत आशा वर्कर्स व मदतनीसांची बैठक घेऊन भ्रूणहत्येचे प्रकार रोखण्याबाबत सूचना दिल्या.म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांड प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाचे केंद्रीय पथक सांगलीत आले आहे. त्यात डॉ. सुषमा दुरेजा, डॉ. वीणा धवन, डॉ. जिग्नेश ठक्कर, डॉ. वर्षा देशपांडे यांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी या पथकाने म्हैसाळला भेट दिल्यानंतर डॉ. सापळे यांच्याशी चर्चा केली. आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या समितीने डॉ. खिद्रापुरे याच्या कृत्याची चौकशी पूर्ण केली असून, याबाबत सोमवारी आरोग्य संचालकांकडे अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागात खिद्रापुरे याने हत्या केलेल्या स्त्री भ्रूणांची व न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील सुविधांची केंद्रीय पथकाने पाहणी केली. बैठकीनंतर पथकाने मिरजेतील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सोमशेखर पाटील यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रातील रेकॉर्ड व कागदपत्रांची तपासणी केली. तेथील रेकॉर्डमध्ये अनियमितता आढळली. सोनोग्राफी रजिस्टरमध्ये रुग्णांच्या स"ा नसल्याने रजिस्टरसह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. पथकाने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी व डॉ. राजेंद्र कवठेकर यांना पाचारण करून सोनोग्राफी केंद्रास टाळे ठोकले. तेथील रेकॉर्डची छाननी करण्याच्या सूचना पथकाने महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. या सोनोग्राफी केंद्रास यापूर्वीही एकदा टाळे ठोकण्यात आले होते.केंद्रीय पथकातील चारपैकी दोघींनी वेगवेगळ्या ठिकाणी अचानक भेटी दिल्या. यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. पंचायत समितीत आशा वर्कर्स, आरोग्य सेविका, मदतनीसांची बैठक घेऊन स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार रोखण्यासाठी सतर्क रहावे. असे प्रकार कोठे सुरू असल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहनही या पथकाने केले. गावातील गर्भवती महिला अचानक दिसेनाशी झाल्यास तिची चौकशी करून माहिती घेण्याची सूचना देण्यात आली. बैठकीस सुमारे १८३ महिला उपस्थित होत्या. बंद सभागृहात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना बाहेर काढून पथकाने महिलांशी संवाद साधला. रुग्णांकडेही विचारपूसकेंद्रीय पथकाने डॉ. सोमशेखर पाटील यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या काही महिला रुग्णांची विचारपूस केली. गर्भवती महिलांना यापूर्वी मुली किती आहेत, याचीही माहिती घेतली. अगोदर मुली असल्याने आता मुली नको असल्याचे काही रुग्णांनी सांगितल्याने सोनोग्राफी केंद्रातील रेकॉर्डची कसून तपासणी करण्यात आली.अधिकारी धारेवरम्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयातील भ्रूणहत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय पथकाने बुधवारी डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयाची तपासणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेबाबत या पथकाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.सिव्हिल डॉक्टरांमुळेच प्रकरण उघडकीस!अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगली शासकीय रुग्णालयामधील (सिव्हिल) डॉक्टरांमुळेच खिद्रापुरे प्रकरण उघडकीस आल्याचा दावा केला. अवैध गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या पीडित महिलेचा मृत्यू अशक्तपणामुळे झाल्याचे भासविण्यात येत होते. मात्र सिव्हिलमधील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी शवविच्छेदनाचा निर्णय घेतल्याने गर्भपात प्रकरण उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.