डोंबिवली : माटुंगा-मुलुंड जलद डाऊन मार्गासह हार्बरच्या कुर्ला-सीएसटी आणि वडाळा रोड-माहीम स्थानकांदरम्यान रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ आणि सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत घेण्यात येणार आहेत.या ब्लॉकमुळे माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलदच्या गाड्या डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून या कालावधीतील वळविलेल्या लोकल सर्व स्थानकांमध्ये थांबविण्यात येणार असल्याचे ‘मरे’च्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले़ हार्बरच्या कुर्ला-सीएसटीसह वडाळा रोड-माहीम स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल. या कालावधीत कुर्ला-भायखळादरम्यान हार्बरची वाहतूक जलदमार्गे वळवली जाणार असून भायखळ्यानंतर ती पुन्हा हार्बरमार्गे धावेल़ सीएसटी-अंधेरी/बांद्रा आणि तेथून सीएसटीमार्गे येणारी वाहतूक ब्लॉककालावधीत रद्द करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ब्लॉकच्या कालावधीत पश्चिम रेल्वेमार्गावरून सकाळी १० ते संध्या. ६ या वेळेत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
By admin | Updated: February 14, 2015 04:03 IST