शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेचा ‘खोळंबा’संपणार

By admin | Updated: October 21, 2016 01:49 IST

मुंबई उपनगरीय मार्गावरील वाढत्या प्रवासी अपघातांची दखल घेत मध्य रेल्वेतर्फे २0 हजार कोटी रुपये खर्चुन मेकओव्हर केला जाणार आहे. नविन मार्ग, पार्किंग आणि १५0 नव्या लोकल

मुंबई : मुंबई उपनगरीय मार्गावरील वाढत्या प्रवासी अपघातांची दखल घेत मध्य रेल्वेतर्फे २0 हजार कोटी रुपये खर्चुन मेकओव्हर केला जाणार आहे. नविन मार्ग, पार्किंग आणि १५0 नव्या लोकल उपलब्ध करुन देण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेवरुन लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि रेल्वे अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली. समितीने ‘रिपोर्ट आॅन रिव्ह्यू आॅफ रायझिंग ट्रेण्ड आॅफ अ‍ॅक्सिडेण्टल डेथ इन मुंबई सबर्बन सिस्टिम’ हा अहवाल मध्य रेल्वेच्या वेबसाईटवर अपलोड केला . यानुसार नवे मार्ग टाकतानाच १५0 नव्या लोकल उपलब्ध करण्याची सूचना आहे. मात्र तत्पूर्वी लोकल उभ्या करण्यासाठी सायडिंगची जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागा मिळत नसल्याने मध्य रेल्वेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सीएसटीवर धीम्या मार्गांना भूमिगत करण्याचा आणि सहा लाईन्सच्या समूहामध्ये अप व डाऊन लाईन्सचा एक लूप तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच पनवेल स्थानकाकरीता समितीने कर्जत आणि रोहापर्यंत सेवा वाढविण्याची सूचना मांडली. सीएसटी, ठाणे, कल्याण, कर्जत आणि कसारा स्थानकांमध्ये या उपाययोजनांची अंमलबजावणी झाली तर धीम्या मार्गावर २0 टक्के लोकल धावू शकतील, असे समितीचे म्हणणे आहे. ट्रान्स हार्बर लाईनवरील रहदारी सीएसटी-कल्याण मार्गापेक्षा कितीतरी वेगाने वाढत असून ४३७ किमी मुंबई उपनगरीय नेटवर्कला दोन मिनिट हेडवे असणाऱ्या मेट्रोसारख्या सेवेमध्ये बदलण्याची योजनाही समोर आली. मध्य रेल्वेला एसी लोकल आणि स्वयंचलित दरवाजाची गरज असल्याचे निष्पन्न झाले. या समितीमध्ये राजन विचारे, पूनम महाजन आणि अरविंद सावंत या खासदारांसह मध्य रेल्वे तत्कालिन महाव्यवस्थापक एस.के.सूद, पालिका आयुक्त अजय मेहता, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त ई-रविंद्रन यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)समितीचा अहवाल- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेवरुन लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि रेल्वे अधिकारी यांची समिती स्थापन - या समितीने ‘रिपोर्ट आॅन रिव्ह्यू आॅफ रायझिंग ट्रेण्ड आॅफ अ‍ॅक्सिडेण्टल डेथ इन मुंबई सबर्बन सिस्टिम’ हा अहवाल बनविला .