शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल

By admin | Updated: August 27, 2016 05:39 IST

सातत्याने कोलमडणारी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई : दादर-माटुंगा दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना जलद मार्गावर घडली आणि डाऊन मार्गावरून जाणाऱ्या लोकलचा बोजवारा उडाला. दीड तासापेक्षाही जास्त वेळ रूळ दुरुस्त करण्यासाठी लागल्याने संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. दादर ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर संध्याकाळी ६.१0च्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेली. ही घटना घडताच जलद लोकल भायखळापासून धिम्या मार्गावरून वळविण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; आणि रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. धिम्या लोकल आणि जलद लोकल एकाच मार्गावरून धावत असल्याने लोकलचा पुरता बोजवारा उडण्यास सुरुवात झाली. लोकल तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त वेळ उशिराने धावत होत्या. त्यामुळे लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी झाली. सीएसटी ते दादर असा लोकल प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एक तास मोजावा लागत होता. दरम्यान, दुरुस्तीचे काम हे रात्री ७.५४च्या सुमारास पूर्ववत करण्यात आले आणि जलद मार्गावरील लोकल सुरू करण्यात आल्या.