शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून महाराष्ट्राला ५२०़८४ कोटींची मदत

By admin | Updated: January 15, 2015 05:07 IST

केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमा’अंतर्गत महाराष्ट्राला ५२० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यात राष्ट्रीय वैरण विकासकामाच्या ६ कोटी २५ लाख रुपयांचाही समावेश आहे़

नारायण जाधव , ठाणेकेंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमा’अंतर्गत महाराष्ट्राला ५२० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यात राष्ट्रीय वैरण विकासकामाच्या ६ कोटी २५ लाख रुपयांचाही समावेश आहे़ तसेच राज्य सरकारनेही ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी जाहीर झालेल्या २३ हजार ८११ गावांत जमीन महसुलात सूट दिली आहे. शिवाय वीज बिलात ३३़५ टक्के सूट, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णत: माफ आणि टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या पंपाची वीजजोडणी न तोडणे बाबत राज्य सरकारने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयाचा शासनादेश आज काढण्यात आला.राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत राज्याला १ हजार १३ कोटी ४९ लाख रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत़ त्यापैकी पहिल्या हप्त्याचे ५०६ कोटी ७५ लाख यापूर्वीच वितरीत केले आहेत. त्यातून ४१५ कोटी राज्य सरकारने विभागीय स्तरावर वितरीत केले आहेत़ आता दुसऱ्या हप्त्याचे ४२२ कोटी ८४ लाख तसेच वैरण विकास कार्यक्रमाचे ६ कोटी २५ लाख रुपये केंद्र सरकारने २२ डिसेंबर २०१४ रोजी राज्याला दिले आहेत. अशा प्रकारे केंद्राकडून राज्याला ९३५ कोटी ८४ लाख रुपये मिळाले आहेत़ यातूनच दुसऱ्या हप्त्याचे ५२० कोटी ८४ लाख रुपये संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तांकडे वितरीत करून शेतकऱ्यांना गोड बातमी दिली आहे़