शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राचे ७५६ कोटी

By admin | Updated: December 27, 2016 03:56 IST

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत राज्यातील २६ मध्यम पाटबंधारे प्रकल्पांसाठी नाबार्डने ७५६ कोटींचे कर्ज दिले आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात

मुंबई : प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत राज्यातील २६ मध्यम पाटबंधारे प्रकल्पांसाठी नाबार्डने ७५६ कोटींचे कर्ज दिले आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात या कर्जाचे वितरण करण्यात आले.वेगवर्धीत सिंचन लाभ कार्यक्रमाचा समावेश आता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत करण्यात आला असून, सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह वैंकय्या नायडू, उमा भारती आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राला ७५६ कोटीचे कर्ज देण्यात आले. केंद्र शासनाने यापूर्वीच ३३९.४० कोटींच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता दिला होता. या योजनेत वाघुर, बावनथडी, निम्न दुुधना, तिलारी, निम्न वर्धा, निम्न पांझरा, नांदुर मधमेश्वर टप्पा-२, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा, बेंबळा, तारळी, धोमबलकवडी, अर्जुना, ऊर्ध्व कुंडलिका, अरुणा, कृष्णा-वारणा, गडनदी, डोंगरगाव, सांगोला शाखा कालवा, खडकपूर्णा वारणा, मोरणा (गुरेघर), निम्न पेढी, वांग, नरडवे (महमद वाडी), कुडाळी इ. प्रकल्पांचा समावेश आहे. वेगवर्धीत सिंचन लाभ योजनेअंतर्गत राज्यातील अपूर्ण २६ प्रकल्प पूर्ण करणेसाठी सन २०१६-१७ ते सन २०१९-२० या कालावधीत एकुण ३८३० कोटी इतके केंद्रीय अर्थसहाय्य मिळणे अपेक्षित आहे. तसेच सदर प्रकल्प पूर्ण करणेसाठी आवश्यक राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम निश्चितपणे उपलब्ध करून देता यावी, यासाठी नाबार्डच्या माध्यमातून दीर्घकालीन ( १५ वर्ष मुदतीचे ) व सवलतीच्या दरात सुमारे ६ टक्के व्याज दराने कर्जाची सुविधा निर्माण करून दिली आहे. या योजनेतून वेगवर्धीत सिंचन लाभ योजनेतील २६ प्रकल्प पूर्ण करणेसाठी एप्रिल २०१६ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत रु. १२७७३ कोटी इतके कर्जसहाय्य उपलब्ध होणारे आहे. सदर २६ प्रकल्प पूर्ण झाल्यावर ५.५६ लक्ष हेक्टर अतिरीक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)