शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा हाऊसिंग रेग्युलेटर अ‍ॅक्ट लागू करावा

By admin | Updated: August 6, 2015 00:54 IST

बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीस आळा घालण्यासाठी केंद्राने प्रस्तावित केलेला हाऊसिंग रेग्युलेटरचा कायदा संसदेने संमत केल्यावर तोच

मुंबई : बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीस आळा घालण्यासाठी केंद्राने प्रस्तावित केलेला हाऊसिंग रेग्युलेटरचा कायदा संसदेने संमत केल्यावर तोच कायदा देशभर लागू करावा. याच विषयावर महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा रद्द करावा, अशी शिफारस संसदेच्या संयुक्त प्रवर समितीने केली आहे.केंद्र सरकारने तयार केलेले ‘रिअल इस्टेट बिल-२०१३’ राज्यसभेत आले असता ते सखोल अभ्यासासाठी सर्वपक्षीय संसदीय प्रवर समितीकडे पाठविले गेले होते. या समितीने आपला अहवाल ३० जुलै रोजी राज्यसभेस सादर केला. ग्राहकांच्या हक्कांसाठी गेली ४० वर्षे लढणाऱ्या मुंबई ग्राहक पंचायतीने या समितीकडे सविस्तर अभ्यासपूर्ण सादरीकरण करून अनेक शिफारशी केल्या होत्या व महाराष्ट्राचा कायदा तुलनेने मवाळ असल्याने केंद्राचा कायदा झाल्यावर तोच कायदा देशभर लागू करून राज्याचा कायदा रद्द करावा, अशी मागणीही केली होती.राज्याचा कायदा रद्द करण्यासह ग्राहक पंचायतीने केलेल्या तब्बल २० शिफारशी स्वीकारून समितीने त्यांचा आपल्या अहवालात समावेश केला असल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या कायद्यातील अनेक त्रुटी व ग्राहकांच्या अहिताच्या तरतुदींकडे लक्ष वेधत ग्राहक पंचायतने राज्यपालांनाही निवेदन दिले होते व राष्ट्रपतींनाही या कायद्यास मंजुरी न देण्याची विनंती केली होती. मात्र संपुआ-२ सरकारच्या अखेरच्या काळात राष्ट्रपतींनी राज्याच्या कायद्यास मंजुरी दिली होती. यास वर्ष उलटले तरी महाराष्ट्राचा हा कायदा अद्यापही पूर्णांशाने लागू झालेला नाही.आता संसदीय समितीने केलेल्या शिफारशी मान्य करून केंद्राचा अधिक कडक तरतुदी असलेला कायदा संसदेत लवकरात लवकर मंजूर होईल, अशी आशा ग्राहक पंचायतीच्या अभियानप्रमुख वर्षा राऊत यांनी व्यक्त केली.समितीच्या महत्त्वाच्या शिफारशीरिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये व्यापारी जागांचाही समावेश.पैसे किंवा प्लॅट देण्यास विलंब झाल्यास ग्राहकाने प्रवर्तकास अथवा प्रवर्तकाने ग्राहकास द्यायच्या व्याजाचा दर सारखाच असावा.५०० चौ. मीटरहून अधिक जागेवरील सर्व रिअल इस्टेट प्रकल्पांना कायदा लागू. याहूनही लहान प्रकल्पांना कायदा लागू करण्याची राज्यांना मुभा.प्रकल्पांचे ३० दिवसांत रजिस्ट्रेशन करणे सक्तीचे.गैरप्रकारांमुळे प्रतिबंध केल्या गेलेल्या प्रवर्तकांची नावे व छायाचित्रे रिअल इस्टेट अ‍ॅथॉरिटीच्या वेबसाइटवर टाकणार.बहुसंख्य सभासदांनी बुकिंग केल्यावर तीन महिन्यांत सोसायटी स्थापणे बंधनकारक.निवासी दाखला मिळाल्यापासून तीन महिन्यांत कन्व्हेयन्स करणे सक्तीचे.ताबा दिल्यापासून पाच वर्षांपर्यंत इमारतीमधील ‘स्ट्रक्चरल डिफेक्ट’ दुरुस्त करण्याची जबाबदारी बिल्डरवर.तक्रारींवर निवृत्त जिल्हा न्यायाधीशांकडून सुनावणी व निवाडा.नियोजन प्राधिकरणाच्या आदेशांचे पालन न केल्यास बिल्डरला तीन वर्षांपर्यंत कैद, प्रकल्प खर्चाच्या १० टक्क्यांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा.(विशेष प्रतिनिधी)