शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 04:46 IST

दुष्काळप्रवण भागात सिंचनाच्या कामांना गती देण्यासंदर्भातील महाराष्ट्राच्या प्रस्तावांस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे

मुंबई : दुष्काळप्रवण भागात सिंचनाच्या कामांना गती देण्यासंदर्भातील महाराष्ट्राच्या प्रस्तावांस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. याबाबतच्या कार्यवाहीस केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन शुक्रवारी नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत जेटली यांनी दिले.वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीची प्रक्रि या अंतिम करताना जकातीबाबत राज्यांसाठी सुलभ धोरण निश्चित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. राज्यातील दुष्काळप्रवण भागात सिंचनाच्या कामांना गती देण्यासाठी यावेळी प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. अर्थमंत्र्यांसोबतच्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी जीएसटीसंबंधित विविध विषयांवर चर्चा केली. या कराची अंमलबजावणी करताना राज्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासंबंधात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी जेटली यांचे लक्ष वेधले. या कराच्या आकारणीत पारदर्शकतेच्या माध्यमातून सुसंगती आणण्यासह संबंधित अधिनियमातील दंड संहिता विषयक तरतुदींची तीव्रता कमी करण्यात यावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)>निति आयोगाच्या उपाध्यक्षांची भेटकृषी-पणन क्षेत्रातील कामगिरीसह कृषीस्नेही सुधारणांमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरल्याबद्दल निति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. ‘इज आॅफ डुर्इंग बिझनेस’ अंतर्गत मानांकन निश्चित करताना महाराष्ट्राने सुचिवलेले सात मुद्दे समाविष्ट न करण्याबाबतच्या निर्णयाचा निति आयोगाने फेरविचार करावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.>प्रधान सचिवांशी चर्चा : राज्यांमधील पायाभूत विकासाच्या मोठ्या प्रकल्पांसाठी जागतिक वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी असलेली प्रक्रि या अधिक सुलभ करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्याशी चर्चा केली.