शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
3
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
4
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
6
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
8
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
9
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
12
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
13
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
14
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
15
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
16
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
17
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
18
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
19
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
20
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...

केंद्राचा दुष्काळनिधी मिळालाच नाही!

By admin | Updated: February 2, 2016 04:17 IST

महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती हाताळण्याकरिता केंद्र सरकारने गेल्या २९ डिसेंबरला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (एनडीआरएफ) ३०५० कोटी रुपये मंजूर केले; मात्र त्यापैकी अद्याप एक छदामही मिळाला नाही

सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा दावा : मात्र खडसे म्हणतात, ६३७ कोटी मिळालेनवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती हाताळण्याकरिता केंद्र सरकारने गेल्या २९ डिसेंबरला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (एनडीआरएफ) ३०५० कोटी रुपये मंजूर केले; मात्र त्यापैकी अद्याप एक छदामही मिळाला नाही, असे राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक स्थितीदर्शक अहवालात म्हटले आहे. मात्र, या अहवालाविषयी राज्याचे मदत व पुनर्वसन खाते अनभिज्ञ आहे. आमच्या खात्यामार्फत असा कोणताही अहवाल दिलेला नसून राज्याला १९ जानेवारीपर्यंत ६३७ कोटी मिळाले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’ला दिली.स्वराज अभियान नामक स्वयंसेवी संघटनेच्या जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीस बजावली होती. यात केंद्र आणि संबंधित राज्यांना दुष्काळग्रस्त भागातील मदतकार्यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील महालिंग पंदरगे यांनी सादर केलेल्या प्राथमिक स्थितीदर्शक अहवालानुसार राज्य सरकारने गेल्या वर्षी २१ जिल्ह्यातील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली होती. परंतु केंद्राकडून अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. राज्यात यंदा जूनमध्ये २२८.४ मिमी, जुलैमध्ये १३० मिमी तर आॅगस्ट महिन्यात १६६.९ मिमी पाऊस झाला होता. पाऊस कमी झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. डिझेल सबसिडी, बियाणे खरेदीवरील सवलत, बागायती आणि अतिरिक्त चारा विकास प्रकल्पांसाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दलही या अहवालात माहिती देण्यात आली आहे. मात्र केंद्राकडून किती पैसा मिळाला याचे उत्तर ‘शून्य’ असल्याचे म्हटले आहे. वास्तविक, हा अहवाल २२ जानेवारी रोजीच सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. मात्र, तो १ फेब्रुवारी रोजी सुनावणीदरम्यान समोर आला. ६३७.१८ कोटी मिळाले!केंद्राने १३ जानेवारी रोजी राज्याला ३०४९.३६ कोटी मंजूर केले. त्यातले ५६३ कोटी राज्याला पूर्वीच मिळालेले होते. ते वजा करुन उर्वरित २५४८.७३ कोटींपैकी ६३७.१८ कोटी रुपये १९ जानेवारी रोजी राज्य सरकारला मिळाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव अशोक आत्राम यांनी लोकमतला दिली........................अहवालाची चौकशी करु - खडसेमदत व पुर्ववसन विभागाने कोणताही अहवाल दिलेला नाही. केंद्र सरकारकडून १९ जानेवारी रोजी ६३७ कोटी मिळाले आहेत. मात्र केंद्राच्या मदतीची वाट न पहाता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत वाटप करुन टाकली आहे. १५ डिसेंबर २०१५ पर्यंत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना १८४४.०४ कोेटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. आता सर्वाेच्च न्यायालयात वकिलांनी कोणती माहिती दिली याची चौकशी केली जाईल असेही खडसे यांनी स्पष्ट केले.................वकील काय म्हणतात?सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या प्राथमिक स्थितीदर्शक अहवालाबाबत विचारले असता अ‍ॅड. पंदरगे म्हणाले, हा प्राथमिक अहवाल असून २२ जानेवारीपर्यंत जी माहिती आमच्याकडे होती ती सादर करण्यात आली. लवकरच सुधारित अहवाल सादर करण्यात येईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)