शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर सूक्ष्म निरीक्षक

By admin | Updated: May 10, 2014 19:12 IST

धुळे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून मतमोजणीत कसलीही गफलत होऊ नये यासाठी १०८ सूक्ष्म निरीक्षकां (मायक्रो आॅब्झर्व्हर)ची नेमण्यात आले आहे.

 धुळे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून मतमोजणीत कसलीही गफलत होऊ नये यासाठी १०८ सूक्ष्म निरीक्षकां (मायक्रो आॅब्झर्व्हर)ची नेमण्यात आले आहे. त्यांचे मतमोजणीवर बारीक लक्ष राहणार आहे. या शिवाय ११८ मतमोजणी पर्यवेक्षक, १२० मतमोजणी सहायक व ११६ शिपाई अशा एकंदर ५८४ अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना यापूर्वीही प्रशिक्षण देण्यात आले असून १० मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सूक्ष्म निरीक्षकांना तर दुपारी १२ वाजता अन्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ३३६ कर्मचार्‍यांची गरज आहे. मात्र राखीव स्वरूपातही कर्मचारी तैनात असणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलावर प्रत्येक एक पर्यवेक्षक, मतमोजणी निरीक्षक , सहायक व शिपाई असे एकूण चार कर्मचारी असणार आहेत. चक्करबर्डी परिसरातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार असून त्यासाठी नियुक्त सर्व कर्मचार्‍यांना तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही ओळखपत्र देण्यात आले आहे. कर्मचार्‍यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणुकीप्रमाणेच मतमोजणी वेळीही निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार केंद्रीय निरीक्षक जी. सथ्यवती, खर्च निरीक्षक श्रीवास्तव आदी उपस्थित राहणार असून ते १४ मे रोजी येथे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १० रोजी वरिष्ठाधिकारी या कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.