शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सेंन्सरद्वारे वारीतील गर्दीचे होणार आकलन

By admin | Updated: June 28, 2016 21:13 IST

पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी, दर्शनासाठी येणारे हजारो भाविक यामुळे पालखी स्थळाच्या ठिकाणी एकाचवेळी किती गर्दी आहे, याची काहीही माहिती पोलिसांना मिळत नाही़ सीसीटीव्हीवरुन

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २८ -  पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी, दर्शनासाठी येणारे हजारो भाविक यामुळे पालखी स्थळाच्या ठिकाणी एकाचवेळी किती गर्दी आहे, याची काहीही माहिती पोलिसांना मिळत नाही़ सीसीटीव्हीवरुन काही अंतरापर्यंतचे दृश्य दिसू शकते़. पण, त्याच्या आजूबाजूला नेमके किती लोक आहेत़ दर्शन घेण्यासाठी येणारे आणि दर्शन घेऊन परत जाणारे त्यांची एकत्रित माहिती उपलब्ध होऊ शकत नाही़. पालखी मुक्काम व त्याच्या परिसरात एकाचवेळी किती लोक आहेत, त्यात मिनिटागणीक किती वाढ होते किंवा घट होते, याची माहिती यंदा पोलिसांना मिळणार आहे तिही सेंन्सरच्या सहाय्याने़ या प्रयोगाविषयी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, दीपक साकोरे यांनी माहिती दिली़ पुणे पोलीस आणि ब्ल्युरेडिएंझ यांच्या वतीने नाना पेठ, रामोशी गेट, पालखी विठोबा चौक, निवडुंगा विठोबा मंदिर, पुलगेट या पाच ठिकाणी सेंन्सर बसविण्यात आले आहे़. पुण्यात पालखी चौक आणि निवडुंगा विठोबा मंदिर येथे पालख्यांचा मुक्काम असतो़. विश्रांतीच्या दिवशी पालख्याच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात़ गर्दी असते, असेच सांगितले जाते़. पण, त्यांची नेमकी संख्या किती असते़ याविषयी आजवर कोणतीही नोंद ठेवण्यात आलेली नाही़ ऐनवेळी गर्दी वाढली. तर त्याची तातडीने माहिती मिळून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी उपाय योजना कशी करता येईल, या विचाराने रियल टाईम क्राऊड मेजरमेंट ही पद्धत वापरण्याचा प्रयोग यंदा प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे़.

 याबाबत ब्ल्यु रानदाईजचे मकरंद हरदास यांनी सांगितले, की दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाच ठिकाणी आपण सेंन्सर बसविण्यात आले आहे़ आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो़. या सेंन्सरच्या ४०० ते ५०० चौरस मीटर परिसरात कोणीही मोबाईल घेऊन आला की, सेंन्सर त्याची नोंद घेईल व त्या ठिकाणी त्यावेळेला किती लोकांची गर्दी आहे, याची माहिती मुख्य निरीक्षण केंद्राला तातडीने स्किनवर दिसेल़ त्या परिसरातून निघून गेल्यावर त्याची संख्या कमी होईल़ त्यामुळे एका ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक लोकांची गर्दी होत आहे, असे दिसत असल्यास पोलीस तातडीने उपाययोजना करुन तेथे काही होणार नाही, याची दक्षता घेऊ शकतील़ ज्यांच्याकडे मोबाईल नाही, यांची गणती यामध्ये होणार नाही़ या सेंन्सरमुळे पालखीच्या परिसरात एकावेळी लोकांची नेमकी संख्या किती आहे, याची माहिती पोलिसांना मिळू शकणार आहे़.