ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. ३० - सिमेंट वाहून नेणाऱ्या भरधाव टँकरने छोट्या मिनी ट्रकला जोरदार धडक दिल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास शहरातील जळगाव रस्त्यावरील सुहास गॅरेजजवळ घडली़अशोक आनंदराव पाटील (३५, दळवेल, ता़पारोळा, जि़जळगाव) असे मयत चालकाचे नाव आहे़सिमेंट वाहून नेणारा भरधाव टँकर (एम़एच़०४ एफयु़ ५७१७) हा जळगावकडे जात असताना समोरून वांगी घेऊन भुसावळकडे येणाऱ्या मिनी ट्रक (एम़एच़१९ बीएम़२१६५) वर आदळला़ धडक इतकी जोरदार होती की चालकाचा जागीच मृत्यू होवून वाहनाचाही चेंदामेंदा झाला़ घटनास्थळी एएसआय फारूक शेख, कैलास मिस्तरी (साकेगाव), संदीप राजपूत यांनी धाव घेत मयत चालकाला बाहेर काढले़ अपघातानंतर सिमेंट टँकरचा चालक पसार झाला असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़