शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जन्मकल्याणक सोहळा उत्साहात

By admin | Updated: February 15, 2016 04:05 IST

बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेवांच्या पंचकल्याणक महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या रविवारी चौथ्या दिवशी जन्मकल्याणक सोहळ््यासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता

सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेवांच्या पंचकल्याणक महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या रविवारी चौथ्या दिवशी जन्मकल्याणक सोहळ््यासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. सकाळी साडेसहापासून भजने, अप्सरांचे नृत्य, सवाद्य रथ मिरवणूक आणि भगवान वृषभदेवांच्या जयघोषामुळे तीर्थस्थळ भक्तिसागरात बुडाले.महोत्सवासाठी सुमारे एक लाख चौरस फुटांचा सर्वतोभद्र महल तयार करण्यात आला आहे. रविवारी जन्मकल्याणकचा कार्यक्र म ठेवण्यात आला होता. सकाळी साडेसहा वाजता भगवान वृषभदेवांचा भक्तिमय वातावरणात जन्म झाला. आचार्य, मुनी, माताजींनी जयघोष करून आनंदोत्सव साजरा केला. सोहळ््यात मूर्तिनिर्माण समितीचे अध्यक्ष डॉ. पन्नालाल पापडीवाल, कुमकुमदेवी पापडीवाल यांना माता-पित्याचा मान देण्यात आला. त्यानंतर पांडूकशिलेवर जन्माभिषेक करण्यात आला. सायंकाळी इंद्र-इंद्रानी यांची महलच्या चौफेर ढोलताशाच्या गजरात रथ मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, ज्ञानमती माता यांनी भगवान वृषभदेवांचे नामकरण करून रात्री पाळणा मंत्रोच्चाराने हलविण्यात आला. (प्रतिनिधी)जन्मकल्याणक सोहळ््यानंतर भगवान वृषभदेव सोमवारी राजकुमार होतील. त्यासाठी त्यांच्या डोक्यावर आठ फूट उंचीचा आणि सव्वीस फुट रु ंदीचा नगीना, काची दगड, दप्त यांनी सजवलेला मुकुट चढविण्यात येईल. त्यानंतर एक हजार मीटर कापडाचा कुर्ता-पायजमा चढविला जाणार आहे. राजकुमारची पूजाअर्चा केल्यानंतर ते दीक्षा घेतील .माता-पित्याने पोटाला चिमटा घेऊन मुलांना लहानाचे मोठे करून मायेची ऊब दिली. त्यांना वृद्धापकाळात मुलांच्या आधाराची गरज असते. मात्र आजची पिढी पत्नीसाठी जन्मदात्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात, याच्याइतके दु:ख कोणतेही नाही. हे पाप असून आजच्या पिढीने मातापित्यांचा सन्मान करून त्यांचा प्रेमाने सांभाळ करावा, हेच खरे पुण्यकर्म.- गानिनीप्रमुख ज्ञानमती माता