ऑनलाइन लोकमत
जव्हार, दि. 19 - शिवजयंती निमित्त, जव्हार तालुक्यातील शिवप्रेमी व जव्हार नगरपरिषद यांच्या सहकार्याने १९ फेब्रुवारी रविवार रोजी जव्हारमधील गांधीचौक येथे शिवजयंती जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गांधी चौक येथे नगराध्यक्ष संदीप वैद्य, उत्सव समिती सभापती कपिल तामोरे, मुख्याधिकारी विधाते, उपसभापति अमित अहिरे, यांच्या हस्ते शिव पुतल्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शिवाजी महाराज शुरवीर कसे झाले, महाराज होते कसे, व त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन कसा केला? या विषयी माहिती देण्यासाठी, शिव अभ्यासक परब यांना बोलाविण्यात आले होते, या विश्लेषकांनी येथील तरुणांना शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदवी स्वराज्य विषयी माहिती देण्यात आली.
शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करण्यासाठी निघाले तेव्हा, जव्हार शहरापासून १ कि.मी. अंतरावर असलेले माळरानावरील सर्वात उंच ठिकाण व शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली टेकडी ते ‘’शिरपामाळ’’ येथे त्यावळी महाराजांनी मुक्काम ठोकला होता, व शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करण्यासाठी निघाले, ते ठिकाण जव्हार मधील ‘’शिरपामाळ’’ येथे आज शिवजयंती निमित्त जावून शिवप्रेमींनी ध्वजारोहण केला, व संपूर्ण शहरात शिवप्रेमींनी गावभर मोटार सायकल ऱ्याली काढली, जव्हार शहरात नाक्यानाक्यावर पूर्ण भगवे झेंडे लावून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली,
शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य विषयी माहिती देण्यासाठी शिव अभ्यासक परब यांना बोलाविण्यात आले होते. त्यांनी काही वेळातच महाराजांचा हिंदवी स्वराज्य काय या विषयी येथील तरुणांना इतिहाह व शिवाजी महाराजांनची माहिती देवून तरुणांची मने जिंकली शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी जव्हार नगरपरिषद, मुख्याधिकारी- वैभव विधाते, नगराध्यक्ष- संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष- दिनेश भट्ट, चित्रागण घोलप, माजी नगरसेवक- रियाज मणियार, समिती अध्यक्ष कपील तामोरे अन्य नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी, शेकडो इतिहास प्रेमी, इतिहास विश्लेषक, व मान्यवर यावेळी उपस्थित होते. व हा शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.