शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दूध पिऊन साजरे करा नवीन वर्ष

By admin | Updated: December 28, 2015 04:09 IST

तीन दिवसांवर येऊन ठेपलेले नवीन वर्ष साजरे करण्याची तयारी प्रत्येकाने सुरू केली असेल. या तयारीमध्ये दारू हा महत्त्वाचा भाग असतो.

नागपूर : तीन दिवसांवर येऊन ठेपलेले नवीन वर्ष साजरे करण्याची तयारी प्रत्येकाने सुरू केली असेल. या तयारीमध्ये दारू हा महत्त्वाचा भाग असतो. मात्र थांबा! दारूचा हा पहिला घोट तुमच्या व्यसनास कारणीभूत ठरू शकतो. यामुळे येणारे नवीन वर्ष दारूऐवजी दूध पिऊन साजरे करण्याचे आवाहन करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दूधवाटपाचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.व्यसनमुक्तीच्या कार्यांतर्गत अंनिसच्या वतीने २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत व्यसनविरोधी निर्धार सप्ताह म्हणून पाळला जातो. याबाबत अंनिसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले की, डे साजरे करण्याच्या चलनामुळे समाजात व्यसनाला प्रतिष्ठा मिळाली आहे. राज्याचा महसूल वाढविण्यासाठी व्यसनाला महत्त्व देण्याचे सरकारचे धोरणही दारूसारखे व्यसन वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या पाच आजारांपैकी नैराश्य हाही एक आजार आहे. हे नैराश्य व्यसनातूनच येते. यातून पुढे हिंसक वळण, मानसिक आजार व आत्महत्यासारखे प्रकार होतात. हे व्यसन जगायला अडथळा निर्माण करणारे आहे.‘द’ दारूचा नाही तर, ‘द’ दुधाचा हा संदेश घेऊन अंनिसतर्फे नवीन वर्षाच्या स्वागतांतर्गत संस्थेच्या केंद्रात दुधाचे वाटप केले जाणार आहे. ३१ डिसेंबरला प्रत्येक शहरात अंनिसच्या शाखेमध्ये दूधवाटप केले जाणार असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. याशिवाय व्यसनाचे दुष्परिणाम चित्रित करणारे ‘प्रतीक्षा’ आणि ‘प्रतिज्ञा’ हे दोन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. हे दोन्ही चित्रपट यू-ट्यूबवर भारतातील सर्वच भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. महाविद्यालयांमध्ये जाऊन युवकांना व्सनापासून अलिप्त राहण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)