शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात दोन महिन्यांत सीसीटीव्ही

By admin | Updated: April 6, 2016 04:57 IST

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्ह्यांचा तपास करण्यास मोलाची मदत व्हावी, याकरिता येत्या दोन महिन्यांत राज्यातील प्रमुख शहरे आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील

मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्ह्यांचा तपास करण्यास मोलाची मदत व्हावी, याकरिता येत्या दोन महिन्यांत राज्यातील प्रमुख शहरे आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.विधानपरिषद सदस्य नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भातील लक्षवेधी मांडली होती. यावर रणजित पाटील बोलत होते. ते म्हणाले, पुण्यातील महत्त्वाच्या दहा ठिकाणी ३५० सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुण्यात रेल्वे स्थानक, बस स्थानक, सिनेमा हॉल, सार्वजनिक बागा, शैक्षणिक संस्था, प्रमुख धार्मिक स्थळे; या संबंधित ठिकाणी पोलीस ठाण्याकडून साध्या वेशातील महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहनांमध्ये हेल्पलाईनचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस बिट मार्शल नेमण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय, आयटी कंपन्यांत महिला सुरक्षाविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)