शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कचराकुंडीवर सीसीटीव्हीचा वॉच

By admin | Updated: June 28, 2016 00:59 IST

प्रभाग क्रमांक ७६ चे नगरसेवक वसंत मोरे यांनी नागरिकांनी कचराकुंडीत कचरा टाकावा व याची शिस्त नागरिकांना लागावी

बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक ७६ चे नगरसेवक वसंत मोरे यांनी नागरिकांनी कचराकुंडीत कचरा टाकावा व याची शिस्त नागरिकांना लागावी, यासाठी सीसीटीव्ही बसवला असून, प्रत्येक कचरा टाकणाऱ्यावर नजर ठेवण्यात येत आहे. पुणे शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. मात्र स्मार्ट सिटी करण्यासाठी स्मार्ट आयडियाच आपले शहर स्मार्ट बनवू शकतील, हे वसंत मोरे यांनी त्यांनी केलेल्या उपक्रमातून सिद्ध करून दाखवले आहे. कात्रज गावाच्या मुख्य चौकात मागील अनेक वर्षांपासून कचराकुंडी आहे. याच ठिकाणी तलाठी कार्यालय, कात्रज भागातील भैरवनाथाचे मंदिर आहे. तसेच मोरे यांचे निवासस्थान व संपर्क कार्यालयदेखील आहे. त्यामुळे या भागात नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते.या कचराकुंडीत पूर्वी सुमारे २५ कुत्रे लोळत पडलेले असायचे. कचराही बाहेर टाकला जायचा. त्यामुळे या चौकात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले होते.यावर उपाय म्हणून वसंत मोरे यांनी या चौकात सीसीटीव्ही बसवले. या सीसीटीव्हीचा एक कॅमेरा या कचराकुंडीकडे तोंड करून बसवला. त्यामुळे या कुंडीत कोण कचरा टाकतो, कोण बाहेर टाकतो, हे सर्व मोरे यांच्या संपर्क कार्यालयातील टीव्हीमध्ये दिसू लागले. या कचराकुंडीशेजारी एक माईक बसवण्यात आला आहे. जो कोणी कचराकुंडीच्या बाहेर कचरा टाकेल त्याचक्षणी माईकवरून सांगण्यात येते, की कचराकुंडीत कचरा टाका. आजूबाजूला असलेले कार्यकर्ते तसेच नागरिकांचे लक्ष तिकडे केंद्रित होते. अनेक जणांना या ठिकाणी बाहेर टाकलेला कचरा कचराकुंडीत हाताने टाकावा लागला. त्यामुळे मागील एक महिन्यापासून प्रत्येक व्यक्ती बरोबर कचराकुंडीतच कचरा टाकतो. कचराकुंडी भरली की क्षेत्रीय कार्यालयामार्फत तातडीने कचराही नेला जातो. त्यामुळे या ठिकाणची घाणदेखील कमी झाली आहे, तसेच नागरिकांना आता कचराकुंडीतच कचरा टाकला पाहिजे ही सवयदेखील लागली आहे. त्यामुळे भाजपने आणलेल्या स्मार्ट सिटीचे स्वप्न मनसेच्या मोरे यांनी आपल्या प्रभागातून स्मार्टपणे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)>सर्वसामान्य नागरिक काही वेळा कचराकुंडीच्या बाहेरच टाकताना दिसतात. त्यांना असे वाटते की आपल्याला कोणी पाहत नाही.नगरसेवकांचीच कचराकुंडी परिसरावर सीसीटीव्हीद्वारे नजर असते. कचरा बाहेर पडताच नगरसेवक त्यांच्या कार्यालयातून लाउडस्पीकरवरून सूचना देतात.