शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी स्थानकांवर सीसीटीव्हींचा ‘वॉच’

By admin | Updated: January 26, 2016 02:59 IST

एसटी स्थानक आणि आगारांत सीसीटीव्ही बसविण्याची चर्चा गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. अखेर या प्रस्तावाला एसटी महामंडळाकडून पुढे सरकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

मुंबई : एसटी स्थानक आणि आगारांत सीसीटीव्ही बसविण्याची चर्चा गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. अखेर या प्रस्तावाला एसटी महामंडळाकडून पुढे सरकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश एसटी स्थानके आणि आगारांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. महिलांची सुरक्षा, कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख, तसेच संशयास्पद व्यक्ती आणि सामानावर लक्ष ठेवण्यासाठी एसटीत सध्या सुरक्षा यंत्रणाच कार्यरत नाही. जानेवारी २0१२मध्ये एसटीच्या संतोष माने याने स्वारगेटमधून बस पळवून रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला आणि यात ९ जण ठार, तर २७ प्रवासी जखमी झाले. त्यानंतर मे २०१२मध्ये अंबाजोगाई-कुर्ला एसटी बसमध्ये एका पार्सलचा ब्लास्ट होऊन वाहकासह त्याची आई, पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले होते. या दोन मोठ्या घटनांनंतर बस स्थानके आणि आगारांत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय एसटीकडून घेण्यात आला. त्यानुसार महत्त्वाच्या ४0 बस स्थानके आणि आगारांत सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात आले. यात मुंबईतील महत्त्वाच्या असलेल्या मुंबई सेंट्रल, परेल, कुर्लाबरोबरच पुण्यातील स्वारगेट, औरंगाबाद, रत्नागिरीतील स्थानक, आगारांचा समावेश होता. आता मात्र, एसटीकडून राज्यातील बहुतांश स्थानके व आगारांत सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लवकरच अहवाल प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू केले जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आगार, तसेच स्थानकातील कामकाजावर देखरेखीसाठी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. - रणजीतसिंग देओल, एसटी महामंडळ- उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक