शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल तोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच

By admin | Updated: January 5, 2017 00:11 IST

झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभे करणारे किंवा फुशारकी मारत विना हेल्मेट गाडी चालविणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 5 - एखाद्या चौकात वाहतूक पोलीस नसतील तर लाल सिग्नल तोडणारे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभे करणारे किंवा फुशारकी मारत विना हेल्मेट गाडी चालविणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र अशा महाभागांची आता खैर नाही. स्मार्ट सिटीकडे पाऊल टाकत असलेल्या नागपुरात आता वाहतुकीचे नियम तोडणारे तंत्रज्ञानाच्या मदतीने कायद्याच्या सापळ्यात सापडणार आहेत. आॅरेंज सिटी चौक ते थेट जपानी गार्डन चौकापर्यंत विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून वाहतूक पोलिसांचा सिग्नलवरील घडामोडींवर बारीक नजर राहणार आहे. नियम तोडणाऱ्यांच्या घरी थेट ई-चालान पोहोचविण्यात येईल.वेळोवेळी समोर आलेल्या आकडेवारीनुसार शहरात वाहतूकदारांना शिस्त नाही, असे स्पष्ट झाले आहे. अनेकदा तर वाहतूक पोलीस असतानादेखील सर्रास नियम तोडले जातात. कुणी मोठ्या वाहनांचा आडोसा घेऊन ट्रिपल सीट निघून जातो, तर बरेच जण गर्दीचा फायदा घेऊन सिग्नल तोडून पसार होतात. या सर्व बाबी लक्षात घेता पोलीस यंत्रणा हायटेक करण्याची सुरुवात झाली. हेल्मेट न घालणाऱ्यांचे फोटो काढून ई-चालान पाठविण्यात येत होते. आता त्याहून एक पाऊल पुढे जात थेट सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच नियम तोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. जर कुणी वाहतुकीचा नियम तोडला तर त्या व्यक्तीचे वाहन सीसीटीव्हीमध्ये कैद होईल व काही वेळातच ई चालान जारी करण्यात येईल.  ई चालान मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत दंड जमा करणे अपेक्षित आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना न्यायालयामार्फत समन्स पाठविण्यात येणार आह व पुढे त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.शहरात ४००० सीसीटीव्ही लागणारनागपुरात येत्या काळात ४००० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. यामुळे पोलीस यंत्रणेला मोठी मदत मिळणार आहे. नियम तोडणाऱ्यांवर वचक तर निर्माण होईलच, शिवाय गुन्ह्यांच्या संख्येवरदेखील नियंत्रण येणार आहे. शहरातील विविध भागात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण झाल्यावर हिट अ‍ॅन्ड रनच्या प्रकरणांतील अज्ञान आरोपीदेखील लपून राहणार नाहीत. शिवाय चेन स्नॅचिंग, छेडखानी, लाचखोरी यासारख्या प्रकरणांवरदेखील नियंत्रण येईल.श्शू...कॅमेरा तुम्हाला पाहतो आहे-सिग्नल तोडणे-वेगाने गाडी चालविणे-विनाहेल्मेट, सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे-स्टॉप लाईनच्या समोर गाडी उभे करणे-अनधिकृत पार्किंग करणे-फॅन्सी किंवा नियमबाह्य नंबर प्लेट लावणे-चुकीच्या दिशेने गाडी चालविणे-नो एन्ट्रीमध्ये गाडी टाकणे