शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेवरील स्थानकांवर सीसीटीव्ही

By admin | Updated: January 15, 2015 05:18 IST

मुंबई शहर आणि उपनगरांतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसविले जात असतानाच आता कोकण रेल्वेमार्गावरील गर्दीच्या स्थानकांवरही सीसीटीव्ही

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसविले जात असतानाच आता कोकण रेल्वेमार्गावरील गर्दीच्या स्थानकांवरही सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. कणकवली स्थानकात नुकतेच सीसीटीव्ही बसविले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रभू यांनी तीन दिवसांपूर्वीच ही घोषणा केली. कणकवली स्थानकात एकूण नऊ सीसीटीव्ही बसविले आहेत. याप्रसंगी बोलताना प्रभू म्हणाले, की प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेमार्गावरील सध्या दोन स्थानकांवर सीसीटीव्ही बसविले आहेत. आणखी गर्दीच्या स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्याचीही लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. यावर रेल्वेतील सूत्रांनी सांगितले, की सुरुवातीला नऊ गर्दीची स्थानके रेल्वेकडून निवडण्यात आली असून, त्यावर सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे की नाही याची चाचपणी केली जात आहे. त्यानुसारच अंतिम स्थानकांची निवड सीसीटीव्ही बसविण्यासाठी केली जाईल, असे सांगण्यात आले. स्थानकांवर टुरिस्ट गाइडपर्यटकांना कोकणची माहिती मिळावी, यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर टुरिस्ट गाइड नेमण्याचा निर्णय झाला आहे. स्थानिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनाच परिसराची संपूर्ण माहिती असल्याने त्यांनाच टुरिस्ट गाइडचे काम देण्यात आले असल्याचे यावेळी प्रभू यांनी सांगितले. १० टुरिस्ट गाइड कणकवली स्थानकात, तर गोवा विभागात ७३ गाइडची नेमणूक केली आहे. या गाइडना कोकण रेल्वेकडून एक बॅचही दिला जाणार असल्याचे सागितले. (प्रतिनिधी)