शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एसटी स्थानकांमध्ये सीसीटीव्ही

By admin | Updated: November 16, 2016 05:49 IST

प्रवाशांच्या सुरक्षितता लक्षात घेता, एसटी महामंडळाने राज्यातील सर्व स्थानकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षितता लक्षात घेता, एसटी महामंडळाने राज्यातील सर्व स्थानकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, लवकरच त्याला अंतिम स्वरूपही देण्यात येईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. राज्यात एसटीचा पसारा खूप मोठा असून, त्यातून ६४ लाख प्रवाशांची वाहतूक होते. जवळपास ५६८ बस स्थानकांमध्ये १८ हजार गाड्यांची ये-जा होत असते. एवढा मोठा पसारा असणाऱ्या एसटी स्थानकांमध्ये मात्र, सुरक्षेविषयीची बोंबच आहे. २0१२ मध्ये पुण्याच्या स्वारगेट स्थानकातून संतोष माने या वाहकाने बस पळवली आणि बेदरकारपणे बस चालवून अनेक वाहनांना धडक दिली. यात ९ जण ठार तर २७ जखमी झाले. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला. ही घटना ताजी असतानाच, त्यानंतर २0१३ मध्ये लातूरमधील एसटी बसमध्ये असलेल्या एका पार्सलमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. तरीही एसटी महामंडळाकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. संतोष माने प्रकरणानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली, परंतु अन्य बस स्थानके आणि तेथे येणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसून आले. आता एसटी महामंडळाने राज्यातील सर्व बस स्थानकांमध्ये दोन टप्प्यांत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रियेचीही सुरुवात करण्यात आल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)